उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत परतलेल्या भाजपने आता मिशन 2024 ची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यात आजवर समाजवादी पक्षाची मूळ व्होट बँक मानल्या जाणाऱ्या यादव समूहाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यासाठी भाजपने (BJP) आता आपली यादव ब्रिगेड तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली असून, त्याद्वारे 2024 पूर्वी यादव, विशेषत: तरुण यादव मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे.
यूपी निवडणुकीच्या निकालाने उत्साहित झालेल्या भाजपने आता भविष्याचा रोड मॅप बनवण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या (Election) निकालांच्या आढाव्यात हे समोर आले आहे की, जिथे इतर वर्गातील लोकांनी भाजपला आपली पहिली पसंती म्हणून मतदान केले, तिथे यादव हे अजूनही समाजवादी पक्षाचे मूळ मतदार आहेत.
भाजपने आता आपल्या ‘यादव नेत्यांना’ पुढे नेण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी ज्या चेहऱ्यांची तरुणांमध्ये लोकप्रियता आहे, अशा चेहऱ्यांची निवड करण्यात आली असून, पक्षाच्या कॅडरमधील यादव नेते किंवा पक्षातील तरुण नेत्यांनाही संधी दिली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने तीन यादवांना तिकीट देऊन या रणनीतीची झलक दाखवली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.