VIDEO: 'देशाविरोधात बोलणाऱ्यांना...', कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले

BJP Leader Kailash Vijayvargiya Statement: भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी रविवारी वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय वातावरण तापवले.
BJP Leader Kailash Vijayvargiya
BJP Leader Kailash VijayvargiyaDainik Gomantak
Published on
Updated on

BJP Leader Kailash Vijayvargiya Statement: भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी रविवारी वादग्रस्त वक्तव्य करुन राजकीय वातावरण तापवले. विजयवर्गीय म्हणाले की, 'देशाविरोधात बोलणाऱ्यांना मारण्यापासून आम्ही मागे हटणार नाही. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. भारत माता की जय बोलणारे सर्व आमचे बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी जीव देऊ शकतो, पण जे भारत मातेच्या विरोधात बोलतात त्यांचा जीव घ्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही.' मध्य प्रदेशातील रतलाम येथे एका कार्यक्रमात विजयवर्गीय यांनी हे वक्तव्य केले.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रतलाम दौऱ्यावर असलेले विजयवर्गीय शनिवारी बांगरोड गावात आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, 'जो भारत माता की जय म्हणेल, तो आमचा भाऊ आहे. त्याच्यासाठी आम्ही मरुही शकतो. पण भारत मातेच्या विरोधात बोलणाऱ्याला मारायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. हा आमचा संकल्प आहे आणि त्यामुळेच भाजपचे अस्तित्व आहे.'

BJP Leader Kailash Vijayvargiya
Video: 'परदेशात मुली जशा बॉयफ्रेंड बदलतात तसं नितीश कुमार...': BJP नेते विजयवर्गीय

दरम्यान, कैलाश विजयवर्गीय हे मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रतलाम ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यकर्ता संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. ते पुढे म्हणाले की, 'जे प्रभू रामांना काल्पनिक मानतात, त्यांनी जानेवारीत अयोध्येला जावे, त्यांचे पाप धुतले जाईल.' तर काँग्रेसवर हल्लाबोल करताना विजयवर्गीय म्हणाले की, 'आम्ही रामलला हम आयेंगे, मंदिर वही बनेगा, असा नारा द्यायचो, तेव्हा काँग्रेस नेते तारीख सांगत नाहीत, असे म्हणायचे. आज अयोध्येत भव्य मंदिर बांधले जात आहे.'

BJP Leader Kailash Vijayvargiya
Madhya Pradesh Election: शिवराज मामा झळकले क्यूआर कोडवर, कॉंग्रेसच्या पोस्टरबाजीला कंपनीचा कडक इशारा

विजयवर्गीय पुढे म्हणाले की, कलम 370 सारख्या मोठ्या मुद्द्यावर मोदी सरकारने घेतलेला निर्णय काँग्रेसला कधीच घेता आला नसता. जम्मू-काश्मीरमध्ये आधी काय परिस्थिती होती हे सर्वांनाच माहीत आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक घरात तिरंगा फडकवला जात आहे. भारताचे मीठ खाऊन पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍यांना खपवून घेतले जाणार नाही, असेही ते म्हणाले. काही लोक 'भारत तेरे तुकडे होंगे...' अशा घोषणा देतात, मला सांगा अशा लोकांना सहन करावे का? ते पुढे म्हणाले की, वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणण्यास कोणत्याही भारतीयाला हरकत नसावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com