भाजपकडून राज्यसभेत ही मुस्लीम चेहरा नाही ?

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जुनला मतदान
Rajyasabha
RajyasabhaDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपकडून मुस्लिमांना दूय्यम स्थान दिले जात आहे. तसेच देशात हिंदू - मुस्लिम यांच्यात द्वेष वाढवण्यास भाजप कारणीभूत असल्याचा आरोप अनेकदा विरोधी पक्ष करताना दिसत आहेत. यातच राज्यसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची यादी भाजपने घोषित केली आहे. ही निवडणुक 10 जुनला होत आहे. यामध्ये एकही मुस्लीम चेहरा देण्यात आलेला नाही. यापुर्वी राज्यसभेत भाजपकडून मुख्तार अब्बास नक्वी सय्यद जफर इस्लाम आणि एम. जे. अकबर या 3 मुस्लीम खासदारांना पाठवण्यात आले होते. मात्र आता त्यांना संधी दिली गेली नसल्याने राज्यसभेत भाजपकडून कोणीही मुस्लीम चेहरा नसेल. (BJP is not a Muslim face in Rajya Sabha? )

दुसरीकडे लोकसभेतही भाजपकडून कोणताही मुस्लीम चेहरा नाही. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपकडून 6 मुस्लीम उमेदवार रिंगणात होते, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एनडीएमध्ये केवळ एक मुस्लीम खासदार आहे. खगडियामधून मेहबूब अली कैसर लोजपकडून निवडून आले आहेत.

Rajyasabha
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल

राज्यसभेच्या 15 राज्यांमधील एकूण 57 जागांसाठी 10 जुनला मतदान होत आहे. या सर्व जागांचा कालावधी जुन ते ऑगस्टमध्ये कार्यकाळ संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे.

विधानसभेत स्वतंत्रपणे निवडून आलेले 13 अपक्ष आमदार

विधानसभेत स्वतंत्रपणे निवडून आलेले 13 अपक्ष आमदार आहेत. तर 16 आमदार छोट्या छोट्या पक्षातून निवडणून आले आहेत. 13 पैकी आठ अपक्षांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिलेला आहे. 16 पैकी 10 लहान पक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण 170 आमदारांचे संख्याबळ आहे.

मात्र सत्तास्थापनेसाठी असलेल्या 8 अपक्ष आणि 13 लहान पक्षांना राज्यसभेसाठी व्हिप लागू नसणार आहे. लहान पक्षापैकी समाजवादी ( 2), प्रहार ( 2 ) माकप (1), शेकाप (1) स्वाभिमानी (1) आणि शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारीचे एक अशा सात जणांचे महाविकास आघाडीला मतदान होईल. मात्र आठ अपक्षांसह बहुजन विकास आघाडीचे तीन अशा 11 आमदारांची भूमिका मात्र निर्णायक ठरणार आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांचा कोठा निश्चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com