Karnataka: विधान परिषद निवडणुकीसाठी येडीयुरप्पांच्या मुलाला पक्षाने नाकारले तिकीट

कर्नाटकात (Karnataka) होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
B. S. Yediyurappa
B. S. YediyurappaDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने चालुवादी नारायणस्वामी, हेमलता नायक, एस केशवप्रसाद, लक्ष्मण सावदी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर बसराज होरत्ती यांना शिक्षक कोट्यातून तिकीट देण्यात आले आहे. (BJP has not given a ticket to Vijayendra son of former Chief Minister BS Yeddyurappa for Assembly elections)

विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे पुत्र विजयेंद्र यांना पक्षाने तिकीट दिलेले नाही. तर, विजयेंद्र हे सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. दुसरीकडे, पुढील वर्षी मे पूर्वी राज्यात निवडणुका होणार आहेत. याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये पक्षाने येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना मुख्यमंत्री केले होते.

B. S. Yediyurappa
कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा | Karnataka minister Eshwarappa resigns | Gomantak Tv

राज्य समितीने विजयेंद्र यांचे नाव दिले होते

कर्नाटकात (Karnataka) विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जून रोजी निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत, भाजपच्या राज्य युनिटने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती, परंतु केंद्रीय नेतृत्वाने ही शिफारस डावलून विजयेंद्र यांना तिकीट नाकारले.

B. S. Yediyurappa
Karnataka Hijab Row: 'हिजाब बंदी'च्या निकालावरुन पाकिस्तान आक्रमक

नेतृत्व विजयेंद्रला मोठी भूमिका देऊ शकते

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय नेतृत्व विजयेंद्र यांना मोठी भूमिका देऊ शकते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यानुसार पक्षाने असा निर्णय घेतला. येडियुरप्पा यांना आपल्या मुलाला आमदार बनवण्याची इच्छा असल्याच्याही काही बातम्या आल्या होत्या. यानंतर त्यांना बसवराज बोम्मई मंत्रिमंडळात मंत्री करण्याचा आग्रह धरायचा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com