...अन् तुटलेला हात घेऊन तरुण रुग्णालयाकडे धावला, बिहारच्या भागलपूरमध्ये नेमकं घडलं काय?

भागलपूर जिल्ह्यात चालत्या ट्रेनमधून पडल्याने एका व्यक्तीला हात गमवावा लागला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Train
TrainDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागलपूर जिल्ह्यात चालत्या ट्रेनमधून पडल्याने एका व्यक्तीला हात गमवावा लागला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

रविवारी रात्री सुलतानगंज रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. या घटनेनंतर फुली डुमर गावातील सुमन कुमार यादवने तुटलेला हात घेऊन हॉस्पिटलकडे गाठले.

दरम्यान, सुलतानगंज रेल्वे पोलिस स्टेशनच्या स्थानिक जीआरपी कर्मचाऱ्यांनी पीडित व्यक्तीची भेट घेतली आणि त्याला सुलतानगंज येथील रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी (Doctors) त्याला पुढील उपचारासाठी जेएलएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, भागलपूर येथे हालवले आहे.

Train
Bihar Crime: 14 वर्षाच्या मुलासोबत विवाहित महिलेचा 'इश्क', कुटुंबियांनी पकडले अन्...

“चालत्या ट्रेनमधून पडलेल्या आणि हात गमावलेल्या एका व्यक्तीला आम्ही वाचवले आहे. त्याला रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना अपघाताविषयी कळवण्यात आले आहे,” असे जीआरपी सुलतानगंजचे एसएचओ यांनी सांगितले.

Train
Bihar Crime: 'कोचिंगमध्ये प्रेम, हॉस्टेलमध्ये जवळीकता वाढली...'; अधिकारी होताच मुलाने दिला धोका

दुसरीकडे, या वर्षी ऑगस्टमध्ये मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोनमध्ये एका 4 वर्षीय मुलीचा हात मोटारसायकलच्या चाकात अडकल्याने तुटला होता. तुटलेला हात एका पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते.

खरगोन जिल्ह्यातील चित्तोडगड-भुसावळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला होता. शहरातील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुलीला इंदूरला रेफर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com