Bihar Academic Controversy: ''मोहम्मद नितीश... मोहम्मद लालू...'' शाळांमधील हिंदू सणांच्या सुट्या रद्द करण्यावरुन गिरीराज सिंह भडकले

Bihar Academic Calendar Controversy: बिहारमध्ये शिक्षण विभागाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
CM Nitish Kumar
CM Nitish KumarDainik Gomantak
Published on
Updated on

Bihar Academic Calendar Controversy: बिहारमध्ये शिक्षण विभागाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि मकर संक्रांतीच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आता यावरुन विरोधकांनीही नितीश सरकारवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर सरकारने ईद-बकरीदच्या सुट्या वाढवल्या आहेत. बिहार शिक्षण विभागातील सर्वात सक्षम आणि गतिमान अधिकारी के पाठक यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. जे अनेकदा शाळांची तपासणी करताना दिसतात.

पण काल ​​त्यांनी बिहार सरकारचे शैक्षणिक कॅलेंडर 2024 जारी केले, ज्यामध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि मकर संक्रांती या हिंदू सणांच्या सुट्ट्या कापण्यात आल्या आहेत. शिवाय सरकारने ईद, बकरीद आणि मोहरमच्या सुट्या वाढवल्या आहेत. सरकारला महात्मा गांधींचाही विसर पडला. सरकारने आता गांधी जयंतीची सुट्टी रद्द केली आहे.

गांधीजींनाही सोडले नाही

शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार दिवाळीला एक दिवस आणि छटपूजेला तीन दिवस सुट्टी असेल. त्याचबरोबर दुर्गापूजेला आता 6 दिवसांऐवजी केवळ 3 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. तर रामनवमी-रक्षाबंधनाच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ईद-बकरीदच्या सुट्या 2 दिवसांवरुन 3 दिवस करण्यात आल्या आहेत. तर उन्हाळी सुट्या 20 वरुन 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

CM Nitish Kumar
Nitish Kumar: "गृहमंत्र्यांना फोन लावा" नितीश कुमार विसरले स्वत:चे खातं, जनता दरबारातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, नितीश सरकारच्या (Government) या निर्णयानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदींनी निशाणा साधत म्हटले की, नितीश सरकारने बिहारला ''इस्लामिक राज्य'' म्हणून घोषित करावे. नितीश कुमार हिंदूंना जातींमध्ये विभागून आणि अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करुन मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोदी म्हणाले.

गिरीराज म्हणाले- मोहम्मद नितीश, मोहम्मद लालू

भाजपचे (BJP) फायर ब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, या लोकांनी हिंदू सणांच्या दिवशी मुलांच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत. भविष्यात ते मोहम्मद लालू आणि मोहम्मद नितीश या नावाने ओळखले जातील असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com