Bihar Election Result 2025: बिहारमध्ये पुन्हा NDA? नितीशकुमार यांची जादू कायम; RJD-काँग्रेस आघाडी पिछाडीवर

Bihar Election Result: बिहारमध्ये झालेल्या ऐतिहासिक आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू झाली असून प्रारंभीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
Bihar Election Result 2025
Bihar Election Result 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

बिहारमध्ये झालेल्या ऐतिहासिक आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू झाली असून प्रारंभीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील २४३ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात (६ आणि ११ नोव्हेंबर) मतदान पार पडले होते. आता ईव्हीएममध्ये कैद झालेल्या उमेदवारांचे भवितव्य उघड होऊ लागले आहे.

सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर पहिल्या एक ते दीड तासांत मिळालेल्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, भाजप 70 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. जेडीयूने देखील उत्कृष्ट कामगिरी करत 73 जागांवर आघाडी घेत इतिहास रचल्याचे प्रारंभीचे कल सांगत आहेत.

एनडीए एकूण 160 जागांवर आघाडीवर असल्याचे संकेत मिळाले आहेत, तर महाआघाडी 79 जागांवर पुढे आहे. महाआघाडीत सर्वाधिक आघाड्या आरजेडीच्या खात्यात (58), तर काँग्रेसला 15 आणि डाव्या पक्षांना 2 जागांवर आघाडीचे कल मिळत आहेत.

Bihar Election Result 2025
Goa Crime: बागा बीचवरील 'तो' व्हिडिओ व्हायरल झाला अन् पोलिसांनी सूत्रे हलवली! तरुणीची छेड काढणारा राजस्थानचा 23 वर्षीय तरुण गजाआड

निवडणुकीचे दोन्ही प्रमुख गठबंधन एनडीए आणि महाआघाडी यांनी मतमोजणीपूर्वी विजयाचा दावा केला होता. मात्र, बिहारच्या जनतेने कोणावर विश्वास दाखवला आहे हे मतमोजणीतील कल स्पष्ट करत आहेत. भाजपच्या आघाडीमुळे एनडीएच्या उत्साहात मोठी भर पडली आहे.

यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरही मोठी चर्चा रंगली होती. एनडीएने अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नसला तरी भाजप आणि जेडीयू नेते सतत विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच आपल्या युतीचा चेहरा म्हणून समोर करत होते. दुसरीकडे, महाआघाडीने निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले होते.

Bihar Election Result 2025
Goa Accident: ताबा सुटला! 2 स्कुटर आदळल्या एकमेकांवर; कुठ्ठाळी येथील अपघातात दोन्ही चालक जखमी

मतमोजणीची प्रक्रिया पुढे सरकत असताना निकालांची रूपरेषा अधिक स्पष्ट होत जाईल. बिहारमध्ये कोण सत्तेवर येणार, कोणता पक्ष मोठा ठरेल, आणि कोणाच्या हातात राज्याची धुरा जाणार हे काही तासांत निश्चित होईल. सध्याच्या कलांनुसार मात्र एनडीए बिहारच्या सत्तेच्या शर्यतीत ठोस आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com