Bihar Crime News : धक्कादायक; पैशांच्या वादातून चुलत भावांनी केली भावाची हत्या

एका व्यक्तीला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ उडाली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

बिहारची राजधानी पाटणा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील फतुहा येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ उडाली.

खून करून मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्याचबरोबर मारेकऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Crime News
Afghanistan Blast : काबूलमध्ये पुन्हा स्फोट; रशियन दूतावासाजवळील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार राजधानी पाटणामधील फतुहा पोलीस स्टेशन हद्दीतील माल बिघा गावात पैशाच्या वादातून एका तरुणाची त्याच्या चुलत भावांनी काठीने बेदम मारहाण केली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर फतुहा डीएसपी राजेश कुमार मांझी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. दुसरीकडे, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com