बिहारमधील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं तापलं आहे. विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी विधानसभेत त्यांच्या चेंबरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलत होते. यावेळी नितीश म्हणाले, 'आजपर्यंत मी राज्यसभेचा सदस्य झालेलो नाही. बघा इथून कधी राज्यसभेवर जाता येईल.' (Bihar Chief Minister Nitish Kumar wants to go to Rajya Sabha understand what the whole matter is)
दरम्यान, नितीश कुमार त्यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत नालंदामधून (Nalanda) पुन्हा एकदा उमेदवारी घेता येईल का, असा प्रश्न नितीश कुमार यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, 'असे काही नाही. या दौऱ्याची सुरुवात येथून होईल. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दौरा करणं शक्य झालं नव्हतं.' याच क्रमाने त्यांना राज्यसभेवर जाणार का, असा प्रश्न विचारला असता, 'तशी माझी इच्छा आहे.'
तसेच, नितीश यांनी दोनदा बिहार विधानसभेसाठी 1985 आणि दुसरी 1995 मध्ये तर बारह लोकसभा मतदारसंघातून 1989, 1991, 1996, 1998, 1999 आणि नालंदा 2004 मध्ये लोकसभेची जागा जिंकली होती. नोव्हेंबर 2005 मध्ये मुख्यमंत्री निवडून आल्यावर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून असलेले सुशील मोदी (Sushil Modi) आणि आता राजकीय विरोधक लालू यादव (Lalu Prasad Yadav) हे दोन्ही विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.
शिवाय, भाजपने उपराष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्यास राज्यसभेवर जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे मानले जात असताना आता नितीश यांनी मन की बात करुन राजकीय अटकळांना नक्कीच खतपाणी घातले आहे. बोचहान विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या बाजूने प्रचार करण्याची घोषणाही नितीश यांनी बुधवारी केली. त्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांना रितसर निमंत्रणही दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.