सर्वोच्च न्यायालयात घडणार मोठा इतिहास; पहिल्यांदाच होणार 'या' गोष्टी

Supreme Court of India: पहिल्यांदाच तीन महिला न्यायाधीश एकाचवेळी शपथ घेणार आहेत.
Supreme Court of India
Supreme Court of IndiaDainik Gomantak

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) मंगळवारी इतिहास घडवला जाणार आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक गोष्टी घडतील ज्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी 10.30 वाजता न्यायव्यवस्थेमधील एक नवा इतिहास लिहीला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रथमच नऊ न्यायाधीश एकत्र शपथ घेणार आहेत. यापूर्वी एवढ्या संख्येने न्यायाधीशांची एकत्र नियुक्ती झालेली नव्हती. प्रथमच न्यायाधीश न्यायालयाच्या कक्षात नव्हे तर सभागृहात शपथ घेणार आहेत. कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. याशिवाय पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शपथविधीचे थेट प्रक्षेपण सुद्धा होणार आहे.

सर्वोच्च न्यायलयात पहिल्यांदाच तीन महिला न्यायाधीश एकाचवेळी शपथ घेणार आहेत. पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायलयात चार महिला न्यायाधीश काम करणार आहेत. न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना शपथ घेताच देशाला प्रथमच 2027 मध्ये पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना (BV Nagarathna) यांनी शपथ घेतल्यावर कर्नाटक उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनताच देशाच्या इतिहासात ही गोष्ट लिहीली जाणार आहे. 2027 मध्ये ज्येष्ठतेनुसार बी.व्ही. नागरथना या देशातील पहिल्या महिला सरन्यायाधीश (CJI) होतील. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ 36 दिवसांचा असेल.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात प्रथमच वडील आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार आहेत. तसेच, न्यायपालिकेच्या इतिहासात एक वडील आणि एक मुलगी CJI बनण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Supreme Court of India
मोदी 'तालिबान' हा शब्दही उच्चारत नाहीत: ओवेसींची जहरी टीका

न्यायमूर्ती नागरथना यांचे वडील न्यायमूर्ती ईएस वेंकटरमैय्या यापूर्वी सीजेआय होते. कर्नाटकातील बारमधून पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्या कर्नाटकातील सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या कर्नाटकातील त्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com