देशात लग्नसमारंभावर पाण्यासारखा पैसा खर्चा केला जातो. प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार लग्नसमारंभावर खर्च करतो. आता वेडिंग प्लॅनर, डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग फोटोशूट मोठ्या हौशीने केले जाते. एका अहवालानुसार, भारतातील वेडिंग इंडस्ट्रीचा (Indian Wedding Industry) आकार सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा आहे.
भारतात (India) लोक शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च करतात. फूड आणि ग्रोसरीनंतर हे दुसऱ्या नंबरवर आहे. भारतीय लग्न समारंभावर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च होतो. भारतात दरवर्षी 80 लाख ते 1 कोटी विवाह होतात. हे चीनसारख्या देशांपेक्षा जास्त आहे, जिथे दरवर्षी सुमारे 70-80 लाख विवाह होतात, तर अमेरिकेत हा आकडा 20-25 लाख आहे.\
ब्रोकरेज फर्म जेफरीजने एका अहवालात म्हटले की, भारतीय वेडिंग इंडस्ट्री हा यूएस उद्योगाच्या (US$ 70 अब्ज) आकाराच्या दुप्पट आहे. तथापि, ते चीनपेक्षा (China) लहान आहे (US$ 170 अब्ज). अहवालानुसार, भारतातील खपत श्रेणीत विवाहसोहळा दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील विवाहसोहळे भव्य असतात आणि त्यात अनेक प्रकारचे समारंभ आणि खर्च समाविष्ट असतो.
दरम्यान, विवाह सोहळ्यामुळे दागिने, पोशाख, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना अप्रत्यक्षपणे फायदा होतो. देशात विवाहसोहळ्यांतील उधळपट्टीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाही, परदेशात होणाऱ्या भव्य विवाहसोहळ्यांमधून भारतीय वैभव दिसून येते. "दरवर्षी 8 दशलक्ष ते 10 दशलक्ष विवाहसोहळ्यांसह, भारत हे जगातील सर्वात मोठे वेडिंग डेस्टिनेशन आहे," असे जेफरीज म्हणाले.
CAT नुसार, त्याचा आकार US$ 130 अब्ज इतका असल्याचा अंदाज आहे. भारतातील वेडिंग इंडस्ट्री हा यूएस पेक्षा जवळजवळ दुप्पट आहे आणि मोठ्या उपभोग श्रेणींमध्ये लक्षणीय योगदान देतो. भारतीय विवाहसोहळे अनेक दिवस चालतात, यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते.
अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, भारतात लग्नावर होणारा खर्च हा शिक्षणाच्या दुप्पट आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा खर्च शिक्षणाच्या निम्म्याहून कमी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.