राज्यपालांच्या अधिकारात घट, ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय

पश्चिम बंगाल विधानसभेने एका महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee Dainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगाल विधानसभेने एका महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. ज्याअंतर्गत मुख्यमंत्री या यापुढे सरकारी विद्यापीठाचे कुलपती असतील. दुसरीकडे मात्र, ममता बॅनर्जींच्या या निर्णयाचा भाजप आमदारांकडून विरोध होत आहे. विधेयकाच्या बाजूने 182 आणि विरोधात फक्त 40 मतदान झाले. विधानसभेत हे विधेयक मांडताना राज्याचे शिक्षणमंत्री ब्रात्या बसू म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कुलपतीपदाचा पदभार स्वीकारण्यात काहीही गैर नाही. (bengal cm mamata banerjee to replace governor as chancellor of state university assembly passes bill)

ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान केंद्रीय विद्यापीठ-विश्व भारतीचे कुलपती असू शकतात तर मुख्यमंत्री राज्य विद्यापीठांचे कुलपती का असू शकत नाहीत. तुम्ही पंछी आयोगाच्या शिफारशी पाहू शकता. परंतु प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे.'' या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Mamata Banerjee
West Bengal: भाजप कार्यकर्त्याच्या आईच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जीं व अमित शहा यांच्यात खडाजंगी

दरम्यान, केंद्राच्या आदेशानुसार तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाने अनेक वेळा राज्यपाल धनखर यांच्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल राजभवनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कायद्यानुसार, राज्यपाल कलकत्ता विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ, कल्याणी विद्यापीठ, रवींद्र भारती विद्यापीठ, विद्यासागर विद्यापीठ, बर्दवान विद्यापीठ, उत्तर बंगाल विद्यापीठ यासह 17 विद्यापीठांचे कुलपती आहेत.

Mamata Banerjee
भाजप-काँग्रेसविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न; ममता बॅनर्जीं

दुसरीकडे, शांतिनिकेतनमध्ये, विश्व भारतीचे प्रमुख हे राज्यपाल आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कुलपती आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये राज्यपाल धनखर यांनी बंगालमधील 25 विद्यापीठांच्या कुलगुरुंची आपल्या संमतीशिवाय नियुक्ती केल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com