Video: 'बंदुक चलेगी, तेरी बंदुक चलेगी'!निवडणूक प्रचारात सपना चौधरीचे ठुमके, पोलिसांनीही गमावले स्वतःवरील नियंत्रण

Sapna Choudhary: सपना चौधरी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते, सपना यांनी कोणालाही निराश न करता एकामागून एक गाण्यावर नृत्य करून सर्वांचे मनोरंजन केले.
sapna choudhary Shivpuri Election Dance
sapna choudhary Shivpuri Election DanceDainik Gomantak
Published on
Updated on

'Banduk Chalegi, Teri Banduk Chalegi'! Dance of Sapna Chaudhary in election campaign, even the police losy control over themselves:

शिवपुरी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार ऐबरनसिंग गुर्जर यांच्या प्रचारासाठी पोहोचल्या होत्या.

सपना चौधरी यांनी बसपा उमेदवाराच्या समर्थनार्थ शिवपुरी येथे जाहीर सभेला संबोधित केले. याशिवाय त्यांनी स्टेजवर डान्सही केला.

यावेळी सपना चौधरी यांना पाहण्यासाठी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला. सपना चौधरी स्टेजवर डान्स करत असताना ड्युटीवर असलेले पोलिसही सपना चौधरी यांचा व्हिडिओ बनवताना दिसले.

शिवपुरीच्या खासगी बसस्थानकावर बसपाचे उमेदवार ऐबरन सिंग गुर्जर यांच्या समर्थनार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांना बोलावण्यात आले होते.

सपना चौधरी आल्यानंतर त्यांना आणि त्यांचे नृत्य पाहण्यासाठी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना याठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागला.

sapna choudhary Shivpuri Election Dance
मध्य प्रदेशात कॉंग्रेस, भाजप नव्हे तर 'कडकनाथ'ची चलती, एका कोंबडीची किंमत 1200 ते 1500 रुपयांवर

बसपा उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमासाठी शिवपुरी येथे आलेल्या सपना चौधरी आणि त्यांच्या टीमने लोकांचे भरपूर मनोरंजन केले.

सपना चौधरी यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते, सपना यांनी कोणालाही निराश न करता एकामागून एक गाण्यावर नृत्य करून सर्वांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमात सपना चौधरी यांनी 'बंदुक चलेगी, तेरी बंदुक चलेगी' या गाण्यावर डान्स करताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. जमावाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या खुर्च्याही फोडल्या आणि बॅरिकेड्स तोडून मंचासमोर आले.

यादरम्यान सपना यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आणि पोलिसांनाही जबाबदारी स्वीकारावी लागली.

sapna choudhary Shivpuri Election Dance
Mohammed Shami: "ही गोलंदाजी येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहील," PM Modi झाले मोहम्मद शमीचे फॅन

सपना यांनी अर्धा डझन हरियाणवी गाण्यांवर अनेक परफॉर्मन्स दिले. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात संपूर्ण जनसमुदाय सपना यांच्या नृत्याचा खूप आनंद घेताना दिसला.

नंतर गर्दी अनियंत्रित झाल्यावर सपनाने स्टेजवरून लोकांना शांत राहण्याचे आवाहनही केले, पण लोकांनी ते मान्य केले नाही. शेवटी सपना यांना कार्यक्रम बंद करावा लागला. सुरुवातीच्या काळातही लोकांना स्टेजवरून हटवण्यासाठी प्रशासन आणि सपना चौधरी यांच्या टीमला कसरत करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com