'साहेब, माझा नवरा नपुंसक आहे...', नवविवाहितेने गाठले पोलिस स्टेशन; सासरच्या मंडळींवर केला फसवणुकीचा आरोप

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे नवविवाहित महिलेने पतीविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे नवविवाहित महिलेने पतीविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले. महिलेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा नपुंसक आहे आणि लग्नाआधी ही गोष्ट तिच्यापासून लपवण्यात आली होती. महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडा मागितल्याचाही आरोप केला. सासरच्यांनी हुंड्यासाठी मारहाण केल्याचे तिने तक्रारीत सांगितले.

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, महिलेच्या पतीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांचे एक पथक महिलेच्या पतीची तपासणी करुन महिलेने केलेले आरोप खरे आहेत की नाही हे जाणून घेणार आहे. तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Uttar Pradesh News
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! चहा मिळण्यास उशीर झाल्याने पतीने तलवारीने केली पत्नीची हत्या

दरम्यान, हे प्रकरण तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. इथे राहणार्‍या महिलेने पोलिसांना सांगितले की, 6 महिन्यांपूर्वी तिचे हमीरपूर इथे लग्न झाले होते. मात्र, गेल्या 3 महिन्यांपासून ती तिच्या माहेरी राहत होती. तिने पती नपुंसक असल्याचे सांगितले. लग्न झाल्यापासून तो तिच्या जवळ येण्यास कचरत होता. तिने पतीला याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, मी तुझ्या लायक नाही. महिलेने सांगितले की, हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.

Uttar Pradesh News
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणतात.... 'लोक गोवा ऐवजी काशीला देताहेत पसंती'

दुसरीकडे, महिलेला तिचा नवरा नपुंसक असल्याचे तिला समजले. पण तिच्या सासरच्यांनी ही गोष्ट तिच्या आणि तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवली. एवढेच नाही तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ सुरु केल्याचा आरोप महिलेने केला. त्यामुळे ती आई-वडिलांच्या घरी आली आणि तिथे राहू लागली. महिलेचे म्हणणे आहे की, तिचे सासरचे लोक तिला धमक्या देतात. पतीच्या नपुंसकतेचा कुठेही उल्लेख केला तर ते तिला ठार मारतील, असे म्हटले जाते. तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रमुख कौशल सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चर्चा होत आहे. महिलेच्या पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. यासोबतच हुंड्याच्या मुद्द्यावरही पोलीस कारवाई करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com