Dhirendra Shastri: तो परंपरेतून मिळालेल्या प्रसादाचं वाटप करतोय, धीरेंद्र शास्त्रींना गुरुंचा पाठिंबा

Dhirendra Shastri: तो कोणत्याही महिलेकडं वाईट नजरेनं बघत नाही. तो चारित्र्यहीन नाही. तो काहीही चुकीचं करत नाही असंही रामभद्राचार्यांनी म्हटले आहे.
Dhirendra Shastri
Dhirendra ShastriDainik Gomantak
Published on
Updated on

Dhirendra Shastri: बाबा धीरेंद्र शास्त्री त्यांच्या चमत्काराच्या दाव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कोणत्याही व्यक्तीची माहीती ते सांगू शकतात. त्याचबरोबर, एखाद्या न पाहिलेल्या रुममधील वस्तू न पाहता सांगू शकतात असा दावा त्यांनी केला आहे.

त्यानंतर यावर वाद रंगल्याचं दिसून येत आहे. अंनिसच्या श्याम मानव यांनी त्यांना आव्हान दिले आहे. मी सांगितलेल्या जागी, तिथल्या लोकांबरोबर धीरेंद्र शास्त्रींनी हा प्रयोग करुन दाखवावा ९० टक्के जरी ते बरोबर ओळखू शकले तर मी धीरेंद्र शास्त्रींच्या पायावर डोकं ठेऊन माफी मागेन. अंनिसची ही चळवळ बंद करेन असे श्याम मानव यांनी म्हटले आहे.

आता धीरेंद्र शास्त्रींचे गुरु रामभद्राचार्य आपल्या शिष्याच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. माझा शिष्य चारित्र्यहीन नाही तर हा एक चमत्कार आहे. माझा शिष्य परंपरेतून मिळालेल्या प्रसादाचं वाटप करत आहे. श्याममानव यांनी अंधश्रद्धेची केलेली तक्रार चुकीची आहे. अजमेर शरीफवर जेव्हा चादर चढवली जाते तेव्हा ती अंधश्रद्धा नाही का ? पाखंडी जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतात तेव्हा ती अंधश्रद्धा नाही का ? हे सत्य आहे, अंधश्रद्धा नाही.

Dhirendra Shastri
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

दरम्यान, माझ्या शिष्याला चुकीची धमकी मिळाली आहे. त्याच्यावर अन्याय होत आहे. त्याला धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी मागणीसुद्धा रामभद्राचार्यांनी केली आहे. माझा शिष्य चांगला आहे. तो कोणत्याही महिलेकडं वाईट नजरेनं बघत नाही. तो चारित्र्यहीन नाही. तो काहीही चुकीचं करत नाही असंही रामभद्राचार्यांनी म्हटले आहे. ट्वीटर( Twitter )वरसुद्धा धीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनासाठी हजारो ट्वीट केलं गेल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com