Ayodhya Ram Temple: राम मंदिरातील 'ज्योती'वरुन रणकंदन! सोशल मीडियावर 'चिनी खेळणं' म्हणत ट्रस्टवर टीकेची झोड; नव्या वादाला फुटले तोंड

Ram Janmabhoomi Temple Artificial Jyoti Controversy: अयोध्येतील राम मंदिरात एका 'प्रतिकात्मक ज्योती'ची स्थापना करण्यात आली, परंतु या निर्णयामुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले.
Ram Mandir Artificial jyoti issue
Ayodhya Ram TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Ram Janmabhoomi Temple Artificial Jyoti Controversy: अयोध्येतील राम मंदिरात एका 'प्रतिकात्मक ज्योती'ची स्थापना करण्यात आली, मात्र या निर्णयामुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 11 एप्रिल रोजी एका अधिकृत पोस्टद्वारे माहिती दिली की, ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रभू श्रीरामाची मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवली होती, त्या पवित्र स्थानी आता एक 'ज्योती स्वरुप' स्थापित करण्यात आले. मात्र, ही ज्योत पारंपरिक स्वरुपाची नसून ती कृत्रिम किंवा विजेवर चालणारी असल्याचा आरोप करत काही नेत्यांनी आणि युजर्सनी याला 'चिनी खेळणं' असे संबोधले.

ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या बांधकाम काळात ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान होती, त्या जागेचे पावित्र्य राखण्यासाठी तिथे ही ज्योत स्थापित करण्यात आली. ही ज्योत वैदिक मंत्रोच्चारात आणि योग्य धार्मिक विधींनुसार स्थापित करण्यात आल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले. मुख्य गर्भगृहाचे काम पूर्ण होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जुन्या जागेला चिन्हांकित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या प्रक्रियेत आधुनिक उपकरणाचा वापर केल्यामुळे पारंपरिक विचारांच्या लोकांमध्ये संतापाची लाट पसरली.

Ram Mandir Artificial jyoti issue
Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पवन पांडे नावाच्या एका युजरने यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ही ज्योत पारंपरिक 'अखंड ज्योत' नसल्याचे सांगत त्यांनी ट्रस्टला विचारले की, भारताच्या या पवित्र भूमीवर अखंड दीप प्रज्वलित ठेवण्याची गौरवशाली परंपरा संपुष्टात आली आहे का? त्यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, "एवढ्या मोठ्या संस्थेला प्रत्यक्ष अखंड ज्योत तेवत ठेवणे कठीण झाले आहे का, की अशा पद्धतीने चिनी खेळण्यासारखी दिसणारी कृत्रिम ज्योत इथे ठेवली आहे?" त्यांनी या संदर्भात ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनाही लक्ष्य केले असून धार्मिक परंपरेचा अशा प्रकारे अनादर करणे चुकीचे असल्याचे म्हटले.

Ram Mandir Artificial jyoti issue
Ram Darbar Ayodhya: 40 वर्षे दुर्मिळ संगमरवरावर कोरीवकाम, 1000 कॅरेटचा हिरा, 300 कॅरेट रुबी; कसा आहे 'राजा रामांचा' दरबार?

या टीकेनंतर इंटरनेटवर दोन गट पडले. काहींच्या मते, गर्भगृहाची सुरक्षा आणि देखभाल सुलभ करण्यासाठी असे आधुनिक बदल स्वीकारणे गैर नाही, तर अनेकांच्या मते हिंदू धर्मात अग्नी आणि दीपाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असून तिथे कृत्रिम वस्तूचा वापर करणे हा श्रद्धेचा अपमान आहे. विशेष म्हणजे, अयोध्येचे राम मंदिर हे कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने तिथे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीकडे सूक्ष्म नजरेने पाहिले जात आहे. या वादावर अद्याप राम मंदिर ट्रस्टकडून कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रस्टने केवळ हा एक विधीवत केलेला प्रतिकात्मक बदल असल्याचे आपल्या सुरुवातीच्या निवेदनात म्हटले. आधुनिकता आणि परंपरा यांच्यातील हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com