Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील अतिसंवेदनशील रामजन्मभूमी संकुलात मंगळवारी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी ड्युटीवर असलेला पीएससी कमांडो जखमी झाला. त्याच्या छातीत गोळी लागली. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी जखमी कमांडोला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. येथून डॉक्टरांनी त्याला लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले आहे. जखमी कमांडोची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. एसएसपींनी या संपूर्ण घटनेला अपघात असल्याचे म्हटले असले तरी या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. पीएसी कॅम्पमधून पोलिसांना जोरदार गोळीबाराचा आवाज आला. पीएसी कमांडो रामप्रसाद (50) रा. जैस, अमेठी हा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पोलिसांना दिसला. हे पाहून कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. एसपी सिक्युरिटी पंकज पांडे यांनी रामप्रसादला तातडीने श्रीराम रुग्णालयात दाखल केले. येथून डॉक्टरांनी त्याला तात्काळ दर्शन नगर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले, मात्र त्याची गंभीर प्रकृती पाहता येथील डॉक्टरांनीही त्याला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले. रामजन्मभूमी पोलिस स्टेशनचे एसओ देवेंद्र पांडे यांनी सांगितले की, कमांडो रामप्रसाद आपली एके-47 रायफल साफ करत असताना अचानक गोळी झाडण्यात आली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.