Shri Krishna Temple: 'औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडले होते', ASI चे जन्मभूमी प्रकरणी दाखल केलेल्या RTI ला उत्तर

Aurangzeb Demolished Shri Krishna Temple In Mathura: श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादात मोठी अपडेट समोर आली आहे. मुघल शासक औरंगजेबाने मथुरेत मंदिर पाडून मशीद बांधल्याचे सांगितले जाते.
Shri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute
Shri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid disputeDainik Gomantak
Published on
Updated on

Aurangzeb Demolished Shri Krishna Temple In Mathura: श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादात मोठी अपडेट समोर आली आहे. मुघल शासक औरंगजेबाने मथुरेत मंदिर पाडून मशीद बांधल्याचे सांगितले जाते. माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीच्या आधारे ही बाब समोर आली आहे. आरटीआयमध्ये आग्राच्या पुरातत्व विभागाने म्हटले की, मंदिर पाडल्यानंतर औरंगजेबाने बांधलेल्या मशिदीच्या जागेवर शाही इदगाह मशीद बांधण्यात आली आहे. मैनपुरीच्या अजय प्रताप सिंह यांनी आरटीआय अंतर्गत देशभरातील मंदिरांची माहिती मागवली होती. यामध्ये मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाबाबतही माहिती मागवण्यात आली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या पुरातत्व विभागाने ब्रिटिश राजवटीत 1920 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राजपत्राच्या आधारे दावा केला की, पूर्वी मशिदीच्या जागी कटरा केशवदेव मंदिर होते. जे पाडून मशीद बांधण्यात आली.

कृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप यांनी सांगितले की, ब्रिटिश राजवटीत कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत आणि रस्ते विभागाने उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणच्या 39 स्मारकांची यादी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात नोंदवल्याप्रमाणे दिली होती. या यादीत कटरा केशवदेव भूमी येथील श्री कृष्ण भूमीचा उल्लेख 37 व्या क्रमांकावर आहे. पूर्वी कटरा टेकडीवर केशवदेवाचे मंदिर होते असे लिहिले आहे. ते पाडून ती जागा मशिदीसाठी वापरण्यात आली.

Shri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute
Ayodhya Ram Mandir: 'रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावलं नसलं तरी...'प्रेम सागर यांनी अशी निभावली भक्ती

न्यायालयात पुरावा म्हणून समावेश करु: वकील

कृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप यांनी सांगितले की, ते सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात पुरावा म्हणून याचा समावेश करतील, ज्यामध्ये एएसआयने सांगितले की मंदिर पाडून मशीद बांधली गेली आहे. 1920 च्या राजपत्रात किलियार केला गेला आहे. 39 स्मारकांपैकी 37 व्या क्रमांकावर त्याची नोंद आहे. त्यामुळे स्थिती अगदी स्पष्ट आहे. न्यायालयाने ही स्थगिती रद्द करुन त्यावर आयोग जारी करावा आणि ते या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवेल.

Shri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute
Ayodhya Ram Mandir: 'रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावलं नसलं तरी...'प्रेम सागर यांनी अशी निभावली भक्ती

काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमी वाद?

मथुरेतील वादही काहीसा अयोध्येसारखाच आहे. औरंगजेबाने मथुरेतील मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असा हिंदूंचा दावा आहे. औरंगजेबाने 1670 मध्ये मथुरेतील केशव देवाचे मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला होता. यानंतर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. मथुरेतील हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीवरील मालकी हक्काशी संबंधित आहे. श्री कृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही ईदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. हिंदू पक्षाचे म्हणणे आहे की, केशव देवाचे मंदिर पाडून ही शाही इदगाह मशिदी बांधण्यात आली आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्णाच्या जन्मभूमीला द्यावी, अशी मागणी हिंदूंकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com