गुजरातमध्ये (Gujrat) दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यातील मोरबी (Morbi) जिल्ह्यात तीन जणांकडून 120 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. रविवारी रात्री जप्त करण्यात आलेल्या औषधाची वाजवी किंमत अद्याप माहित नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अंदाजे याची किंमत 600 कोटी असल्याची माहिती मिळत आहे.अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गुजरात आता उडता गुजरात झाला आहे. एटीएसने अमली पदार्थांसह त्या तीन आरोपींना अटक केली आहे.(ATS seized 600 crore heroin in Morbi Gujarat)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलखी बंदराजवळील जिंजुडा गावातून सुमारे120 किलो अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी अंमली पदार्थांच्या समस्येला तोंड देण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट केले की, "गुजरात पोलिसांची आणखी एक कामगिरी. गुजरात पोलिस अंमली पदार्थांच्या समस्येला तोंड देण्यासाठी जोरदार कारवाई करत आहेत. गुजरात एटीएसने जवळपास 120 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत.पाकिस्तानातून सौराष्ट्रच्या किनार्यावरून भारतातील अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थांची अवैध खेप पाठवली जात असल्याची माहिती स्थानिक पोलीस आणि एटीएसएच्या सूत्रांना मिळाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील गुजरातमधील द्वारकाच्या सल्यामध्ये जरत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आणि हेरॉईन जप्त केले होते. याबाबतही पोलीस तपास करत असून या कारवाईतही दोघांना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे याआधीही पाकिस्तानी ड्रग माफिया खालिदने ड्रग्जची मोठी खेप भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याच आठवड्यात, गुजरातमधील पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सुरतमध्ये ड्रग हेरॉइनसह अनेक अंमली पदार्थ जप्त केले. यावेळी तीन आरोपींनाही अटक करण्यात आली. देवभूमी द्वारका येथील विक्रेत्याकडून 88.25 कोटी रुपये किमतीचे 17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.