गुजरात निवडणुकीच्या दरम्यान दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मोठी कारवाई होत आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी एटीएसचे छापे सुरू आहेत. काल रात्रीपासून छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएस जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई करत असून सुरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 150 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या (Money) व्यवहारांबाबत आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.
कोट्यवधी रुपयांची जीएसटी चोरी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद अजमल शेख आणि शहजाद नावाची व्यक्ती एटीएसच्या रडारवर होती. त्याच्यावर अनेक दिवसांपासून एटीएसची नजर होती. एटीएसने या दोघांना शुक्रवारी रात्री प्रथम अटक केली.
साजिद आणि शहजाद राज्यभरात जीएसटी चोरीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची जीएसटी (GST) चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांचे तार पीएफआय (PFI) आणि हवाला रॅकेटशी संबंधित असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.