Assam CM Himanta Biswa Sarma
Assam CM Himanta Biswa SarmaDainik Gomantak

'सरकारी कर्मचाऱ्यांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही...', भाजपशासित सरकारचा मोठा आदेश

Assam CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाममध्ये सरकारी कर्मचारी पत्नी किंवा पती जिवंत असल्यास पुन्हा लग्न करु शकत नाही.
Published on

Assam Government Employee Second Marriage Rule: आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी कायदा आणण्याच्या तयारीत असणाऱ्या हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारकडून मोठा आदेश आला आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, 'आसाममध्ये सरकारी कर्मचारी पत्नी किंवा पती जिवंत असल्यास पुन्हा लग्न करु शकत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा धर्म त्याला पुन्हा लग्न करण्यास परवानगी देतो, तर त्याला त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.'

दरम्यान, या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या (Employees) मृत्यूनंतर त्याच्या दोन पत्नींनी पेन्शनचा दावा केला आहे.

घटस्फोटाच्या निकषांचा उल्लेख कार्मिक विभागाच्या 'ऑफिस मेमोरंडम' (OM) मध्ये नाही, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की ज्या सरकारी नोकराची हयात पत्नी असेल त्याने सरकारची परवानगी घेतल्याशिवाय दुसरे लग्न करु नये. पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

Assam CM Himanta Biswa Sarma
Assam: '...RSS अन् बजरंग दल हजारपट धोकादायक', आसामच्या MLA चे वादग्रस्त वक्तव्य

त्याचप्रमाणे, कोणत्याही महिला कर्मचाऱ्याने राज्य सरकारच्या परवानगीशिवाय पती जिवंत असताना दुसऱ्या व्यक्तीशी विवाह करु नये. कार्मिक अतिरिक्त मुख्य सचिव नीरज वर्मा यांनी 20 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. आसाम नागरी सेवा (आचार) नियम 1965 च्या नियम 26 मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Assam CM Himanta Biswa Sarma
Assam पोलिसांची मोठी कारवाई; मदरशात द्यायचा जिहादी प्रशिक्षणाचे धडे

आसामचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

सरमा म्हणाले की, आमच्या सेवा नियमांच्या दृष्टिकोनातून, आसाममधील (Assam) कोणता सरकारी कर्मचारी दुसऱ्या लग्नासाठी पात्र नाही. मात्र, एखादा धर्म कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा लग्न करण्याची परवानगी देत ​​असेल, तर त्याला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर दोन्ही पत्नी पेन्शनसाठी भांडतात अशी अनेक प्रकरणे आमच्यासमोर आली आहेत. त्यांचा वाद मिटवणे आम्हाला खूप कठीण वाटते. आज अनेक विधवा परस्परविरोधी दाव्यांमुळे या पेन्शनपासून वंचित आहेत. हा नियम याआधीही होता पण आम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही. आता आम्ही त्याची अंमलबजावणी करु.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com