आसाम आणि मेघालय यांनी 50 वर्ष जुन्या वादावर तोडगा काढत मंगळवारी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. राजधानी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या सीमा करारावर स्वाक्षरी केली. आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा (Conard Sangma) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत या करारावर अंतिम शिक्कामोर्तब केले. यावेळी दोन्ही राज्यांचे गृहसचिव आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. दोन्ही राज्यांनी दोन महिन्यांपूर्वी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती, त्यानंतर 31 जानेवारी रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाला मसुदा सादर करण्यात आला होता. (Assam and Meghalaya signed a landmark agreement to settle a 50-year-old dispute)
दरम्यान, या करारानुसार, दोन्ही राज्यांनी 884 किलोमीटर लांबीच्या सीमेवरील वादाच्या 12 पैकी 6 मुद्द्यांचे निराकरण करुन हा करार केला आहे. या अंतर्गत, वादग्रस्त 36.79 किमी जमिनीपैकी 18.51 किमी जमिनीवर आसामचा वाटा असेल आणि ते 18.28 किमी जमीन मेघालयला देईल. आसाम आणि मेघालय (Meghalaya) यांच्यातील सीमावादावरील ठराव अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण दोन्ही राज्यांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरु आहे. मेघालय राज्य म्हणून स्थापन झाल्यापासून, जेव्हा मेघालय राज्य आसामपासून वेगळे झाले तेव्हापासून हा वाद निर्माण झाला होता.
तसेच, सीमेच्या वेगवेगळ्या सीमांकनांमुळे अनेकदा सीमेवरुन वाद झाले आहेत. आसामचा शेजारील राज्य मिझोरामशीही सीमावाद आहे. जुलै 2021 मध्ये, या वादाने हिंसक रुप धारण केले, जेव्हा दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये 5 आसाम पोलिस कर्मचारी शहीद झाले. यावरुन आसाम आणि मिझोरामचे मुख्यमंत्री यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध झाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.