Asia Cup 2025: 8 संघांचे 8 धुरंधर फलंदाज, आशिया कपमध्ये ठरतील 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

Asia Cup 2025 star batsmen: आशिया कप २०२५ चा उत्साह आता सुरू होणार आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
Asia Cup 2025
Asia Cup 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

अवघ्या काही तासांत (९ सप्टेंबरपासून) यूएईमध्ये ८ संघांमध्ये आशिया कप २०२५ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. क्रिकेटप्रेमींनी ज्याची आतुरतेने वाट पाहिली होती, तो क्षण अखेर आलाच आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय यावेळी आशियाचा राजा कोण होणार? भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, यूएई, हाँगकाँग आणि ओमान या आठ संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

भारताचा संघ यावेळी प्रबळ दावेदार मानला जात आहे. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेसाठी प्रसिद्ध असल्याने सर्वोत्तम खेळ करणारा संघच विजेता ठरेल, यात शंका नाही. सर्व संघांकडे आपापले स्टार फलंदाज आहेत, जे या स्पर्धेत संघाला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतरच्या कामगिरीच्या आधारे प्रत्येक संघातील सर्वोच्च फलंदाजांची यादी समोर आली आहे.

Asia Cup 2025
Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

भारत – अभिषेक शर्मा

भारताचा तरुण सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने १७ सामन्यांमध्ये ५३५ धावा करत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १९३.८४ इतका आहे. २ शतके आणि २ अर्धशतकांसह त्याने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली आहे. पहिल्याच चेंडूपासून चौकार-षटकारांचा मारा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आशिया कपमध्ये विरोधी संघांसाठी मोठे आव्हान ठरेल.

पाकिस्तान – सॅम अयुब

पाकिस्तानसाठी डावखुरा सलामीवीर सॅम अयुब गेल्या १५ महिन्यांपासून सातत्याने धावा करत आहे. त्याने ४७९ धावा १५२ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्याच्या नावावर ४ अर्धशतके आहेत. यावेळी तो पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करणार असून १४ सप्टेंबर रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अफगाणिस्तान – सादिकुल्लाह अटल

अफगाणिस्तानने विश्वचषकानंतर फार कमी सामने खेळले आहेत, त्यामुळे धावा कमी आहेत. तरीही डावखुरा सलामीवीर सादिकुल्लाह अटलने ५ सामन्यांत ९५ धावा करून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्याकडे ठोस तंत्र आहे आणि आशिया कपमध्ये त्याची कसोटी लागेल.

Asia Cup 2025
Goa Postcard Campaign: संत मीराबाई शिल्पाची 31 वर्षे, 5 दिवसात 3184 पोस्टकार्डांचा विक्रम

श्रीलंका – पथुम निसांका

श्रीलंकेचा भरोसेमंद फलंदाज पथुम निस्सांका सातत्याने धावा करतो. त्याने १४ सामन्यांमध्ये ५७३ धावा करत संघाचा आधारस्तंभ ठरला आहे. त्याच्या नावावर ४ अर्धशतकं असून त्याचा स्ट्राईक रेट १३३.५६ आहे. दीर्घकाळ क्रीजवर थांबण्याची त्याची क्षमता श्रीलंकेसाठी मोठी जमेची बाजू ठरेल.

बांगलादेश – तन्जीद हसन

डावखुरा युवा स्टार तन्जीद हसन याने १७ सामन्यांत ४२४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३ अर्धशतकं झळकावली असून त्याचा स्ट्राईक रेट १३८.८८ आहे. जलद धावा काढण्याची ताकद त्याच्यात आहे.

युएई – मुहम्मद वसीम

यूएईचा उजव्या हाताचा सलामीवीर मुहम्मद वसीम गेल्या १५ महिन्यांत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने २७ सामन्यांमध्ये तब्बल ८८२ धावा केल्या आहेत. यावेळी तो कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहे. त्याची स्फोटक फलंदाजी संघाला बळकटी देईल.

हाँगकाँग – अंशुमन रथ

हाँगकाँगसाठी अंशुमन रथ हा सातत्याने धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २२ सामन्यांमध्ये ७७८ धावा केल्या असून त्याच्या नावावर एक शतक आणि ५ अर्धशतकं आहेत. जलदगतीने डाव उभारण्याची क्षमता त्याच्यात आहे.

ओमान – जतिंदर सिंग

ओमानचा कर्णधार जतिंदर सिंग संघाचा कणा आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये ३०१ धावा करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. आशिया कपमध्ये तो स्वतःच्या कामगिरीसह संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com