Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा संबंध गुजरात निवडणुकीशी जोडला आहे. ओवेसी म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन महिला संकल्पाचा संदेश देतात, तर दुसरीकडे मोदींच्याच गृहराज्यात अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो.' ते पुढे म्हणाले की, 'राज्यातील निवडणुकीपूर्वी भाजपने तुष्टीकरण करण्यासाठी हा निर्णय घेतला.' ओवेसी पुढे असेही म्हणाले की, 'गँगरेप प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची सुटका केल्याने मुस्लिम समाजात चुकीचा संदेश गेला आहे.'
भाजपसाठी या गोष्टी बोलल्या
ओवेसी पुढे म्हणाले की, 'आरोपींच्या सुटकेने बिल्किस बानोवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे.' एनडीटीव्हीशी बोलताना ओवेसी पुढे म्हणाले, 'गुजरातमध्ये वर्षअखेरीस निवडणुका होणार आहेत. यामध्ये भाजपला (BJP) सलग सहाव्यांदा राज्यात सत्ता स्थापन करायची आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपने राज्यात पुन्हा एकदा तुष्टीकरणाचे राजकारण सुरु केले आहे.'
हे कुटुंब शेतात लपून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते
विशेष म्हणजे, बिल्किस बानोसोबत ही घटना 3 मार्च 2002 रोजी घडली होती. त्यावेळी 21 वर्षीय बिल्किस बानो पाच महिन्यांची गर्भवती होती. यादरम्यान तिच्या स्तनदा बाळासह कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला होता. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात हिंसाचार उसळला होता. हिंसाचारापासून वाचण्यासाठी बिल्किसचे कुटुंब अहमदाबाद (Ahmedabad) शहराजवळील शेतात लपण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान बिल्किसवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.