Lakhimpur Kheri violence: सरकार नेमकं काय लपवतंय?, केजरीवालांचा सवाल

ज्या केंद्रीय मंत्र्यांचं नाव या साऱ्या प्रकरणात आलं आहे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी विनंती देखील केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.(Lakhimpur Kheri violence)
Arvind Kejriwal attacks on Modi Government on Lakhimpur Kheri violence
Arvind Kejriwal attacks on Modi Government on Lakhimpur Kheri violenceDainik Gomantak
Published on
Updated on

लखीमपूरमधील हिंसाचारानंतर (Lakhimpur Kheri violence) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्ला चढवला आहे.या हिंसाचारानंतर मोदी सरकारवर आरोप करताना केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकार मारेकऱ्यांना वाचवण्यात मग्न आहे. यावेळी केजरीवाल म्हणाले की, लखीमपूर खेरीमध्ये संपूर्ण यंत्रणा चिरडली गेली आहे. (Arvind Kejriwal attacks on Modi Government on Lakhimpur Kheri violence)

त्याचबरोबर या घटनेवर सरकारवर हल्ला करतानाच शेतकऱ्यांनी सरकारचं नेमकं काय बिघडवलं आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

या साऱ्या घटनेवर बोलताना, "लखीमपूरमध्ये जे काही घडले, त्यावर अख्खा देश चर्चा करत आहे. मारेकऱ्यांना अजून अटक का केली नाही? मारेकरी का वाचवले जात आहेत? केंद्र सरकार मारेकऱ्यांना वाचवण्यात व्यस्त आहे. लखीमपूरमध्ये जे घडले ते मला ब्रिटिश राज्याची आठवण करून देते." असे म्हणत केजरीवालांनी केंद्र सरकारला टार्गेट केले आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विचारले की, "मारेकऱ्यांना अद्याप अटक का केली नाही? त्यांना का वाचवले जात आहे?नेमका काय मुद्दा आहे इतक्या गर्दीसमोर इतक्या लोकांना चिरडून कोणीतरी पळून कसे जाऊ शकतं. आणि यांनतर तिथे कुणालाच जाऊ दिलं जात नाही मग सरकार तिथं काय लपवत आहे असा सवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकरला केला आहे.

Arvind Kejriwal attacks on Modi Government on Lakhimpur Kheri violence
Lakhimpur Kheri violence: सरकार शेतकऱ्यांवर आक्रमण करतंय, राहुल गांधींचा घणाघात

तसेच पंतप्रधांनांनी घटनास्थळी जाऊन लोकांना भेटलं पाहिजे तरच लोकांना धीर भेटेल असा सल्ला देत त्यांनी ज्या केंद्रीय मंत्र्यांचं नाव या साऱ्या प्रकरणात आलं आहे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी विनंती देखील केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com