Online Scam:"मी थोडे पैसे मागू शकते का?" 'Angel Priya'चा मेसेज आला, तर सावध व्हा; सरकारच्या सायबर दोस्तनं दिला इशारा

Angel Priya Online Fraud: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज कोणी ना कोणी या डिजिटल जाळ्यात अडकतोय.
Angel Priya Online Fraud
Angel Priya Online FraudDainik Gomantak
Published on
Updated on

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज कोणी ना कोणी या डिजिटल जाळ्यात अडकतोय. याला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने जनजागृती करत आहे, परंतु फसवणूक करणाऱ्यांची युक्ती देखील तितकीच चलाख आहे. हे लोक अनेकदा "मुलगी असल्याचं" भासवत गोड बोलून विश्वास संपादन करतात आणि लोकांना जाळ्यात ओढतात.

अलीकडेच भारत सरकारच्या सायबर दोस्त या ट्विटर/X हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये 'एंजल प्रिया' नावाची एक काल्पनिक मुलगी स्क्रीनवर येते आणि विचारते, "मी थोडे पैसे मागू शकते का?" असा मेसेज करत फसवणूक केली जात आहे. या मेसेजवरून सायबर दोस्तनं लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

सायबर दोस्त ही गृह मंत्रालयाचं एक अधिकृत सोशल मीडिया खातं आहे. नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यासाठी सायबर दोस्त कार्यरत आहे. यावर दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकींबाबत माहिती दिली जाते, ज्यामुळे लोक सतर्क राहू शकतात.

Angel Priya Online Fraud
Labour Welfare Goa: कामगार कल्याण मंडळात फक्त 6661 कामगारांची नोंद! CM सावंतांच्या बैठकीत उघड; उद्योगांच्या नोंदणीचे निर्देश

सायबर दोस्त ही गृह मंत्रालयाची एक अधिकृत सोशल मीडिया मोहिम आहे, जी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्यासाठी कार्यरत आहे. यावर दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकींबाबत माहिती दिली जाते, ज्यामुळे लोक सतर्क राहू शकतात.

Angel Priya Online Fraud
Goa Politics: गोव्यात राजकारणाला ‘उकळी’! काँग्रेस, फॉरवर्ड नरम-गरम; कुडचडेत एकाच दिवशी मेळावे

ऑनलाइन फसवणुक टाळण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

  • अनोळखी व्यक्तींच्या प्रोफाईल फोटोवर (DP) विश्वास ठेवू नका.

  • 'मुलगी आहे' अशा समजुतीतून अंधविश्वास बाळगू नका.

  • जर कोणी ऑनलाइन पैसे मागत असेल, तर तत्काळ सतर्क व्हा.

  • अशा प्रकारचे मेसेज, लिंक, किंवा व्हिडीओ आल्यास लगेच सायबर क्राईम विभागात तक्रार नोंदवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com