VIDEO: आंध्र प्रदेशात काळाचा घाला! बस आणि ट्रकच्या धडकेनंतर भीषण आग; 8 प्रवासी जिवंत जळाले, 18 गंभीर जखमी

Markapuram bus truck accident: आंध्र प्रदेशातील मारकापुरम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक थरारक आणि तितकीच दुर्दैवी घटना घडली.
Markapuram bus truck accident
Markapuram bus truck accidentDainik Gomantak
Published on
Updated on

आंध्र प्रदेशातील मारकापुरम जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. रायवरम परिसरात प्रवाशांनी भरलेली बस आणि खडीने भरलेला टिपर ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, धडक होताच दोन्ही वाहनांनी क्षणात पेट घेतला. या आगीच्या तांडवात बसमधील ८ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

निष्पाप जीव

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. टक्कर झाल्यानंतर बसने इतक्या वेगाने पेट घेतला की प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. विशेषतः बसच्या मागील बाजूस बसलेले प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. धूर आणि आगीच्या लोटांमुळे गुदमरून आणि जळून आठ जणांचा कोळसा झाला. स्थानिक नागरिकांनी जिवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली आणि खिडक्यांतून काही प्रवाशांना बाहेर काढले, ज्यामुळे १८ जणांचे प्राण वाचले.

Markapuram bus truck accident
Goa Cabinet Expansion: पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्र्यांची भूमिका कायम; राजकीय हालचालींना वेग

मृतदेहांचा शोध सुरू

मारकापुरमचे पोलीस उपअधीक्षक (DSP) नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. "आम्ही आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढले आहेत, मात्र बसच्या जळालेल्या सांगाड्यामध्ये अजूनही काही मृतदेह अडकलेले असण्याची भीती आहे," असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या बचाव पथक गॅस कटरच्या साहाय्याने बसचा ढिगारा उपसण्याचे काम करत आहे.

Markapuram bus truck accident
Bus Accident: भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस पाण्यात कोसळली, 23 जणांचा मृत्यू; घटनेचा Video Viral

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

या घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी प्रशासनाला जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश दिले असून मृतांच्या वारसांना धीर देण्याचे आवाहन केले आहे. पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम करत असून त्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील. या अपघातामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com