Ram Navami Blast: बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये रॅलीत स्फोट

या घटनेत एक महिला जखमी झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Ram Navami West Bengal Blast
Ram Navami West Bengal BlastDainik Gomantak
Published on
Updated on

An explosion occurred during a rally on the occasion of Ram Navami in Shaktipur area of West Bengal's Murshidabad district on Tuesday

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शक्तीपूर भागात मंगळवारी रामनवमीच्या मुहूर्तावर निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट झाला. एक महिला आणि दोन लहान मुलांसह 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणि अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरात तणावाचे वातावरण आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे.

  • रामनवमीला बंगालमध्ये हिंसाचार

याप्रकरणी पोलिसांचे अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही. या काळात आजूबाजूच्या अनेक घरे आणि दुकानांमध्ये जाळपोळ आणि लुटमारही करण्यात आली. गेल्या वर्षी रामनवमीच्या दिवशीही बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.

उत्तर दिनाजपूरच्या दालखोला, हावडा येथील शिवपूर आणि रिसरा आणि हुगळीच्या श्रीरामपूरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांवर हल्ले झाले. या घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. एनआयए या घटनांचा तपास करत आहे.

रामनवमीच्या मिरवणुकीत शक्तीपूरशिवाय जिल्ह्यातील माणिक्याहार भागातही हल्ला करण्यात आला होता. माणिक्याहार परिसरातही चोरट्यांनी आग लावली आणि अनेक घरे आणि दुकाने लुटली.

शक्तीपूर येथील घराच्या छतावरून मिरवणुकीवर हल्लेखोरांनी दगडफेक सुरू केली. मिरवणुकीला लक्ष्य करून बॉम्बही फेकण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तृणमूल समर्थित बदमाशांनी मिरवणुकीवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • भाजपने ममता यांना जबाबदार धरले

हिंसाचाराच्या घटनेसाठी भाजपने राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि राज्याचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जींचे लोकांना भडकवणारे प्रक्षोभक भाषण या हिंसाचाराच्या घटनेला जबाबदार आहे. जे त्या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सभांमध्ये सतत देत होत्या.

त्याचवेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांचे पोलीस हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. हिंदूंवर खुलेआम हल्ले झाले आणि त्यांचे पोलीस मूक प्रेक्षक राहिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी हिंसाचाराच्या घटनेची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये जखमींना पाहण्यासाठी आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'च्या घोषणा दिल्या. यावेळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अधीर यांच्यावर भाजप नेत्याला धक्का दिल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com