Union Ministry of Finance: हेरगिरी प्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याला अटक, गोपनीय माहिती...!

हेरगिरी प्रकरणी अर्थ मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तो कॉन्टॅक्टवर काम करत होता.
Union Ministry of Finance
Union Ministry of FinanceDainik Gomantak

Union Ministry of Finance: हेरगिरी प्रकरणी अर्थ मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तो कंत्राटावर काम करत होता. तो डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे. पैशाच्या बदल्यात संवेदनशील माहिती इतर देशांना दिल्याचा आरोप आहे. आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या फोनवरुन तो गुप्त माहिती शेअर करत होता. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने या कर्मचाऱ्याला अटक केली. सुमित असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो वित्त मंत्रालयात कंत्राटी पद्धतीने नियुक्त झाला होता.

दरम्यान, पैशाच्या बदल्यात सुमित डेटा लीक करायचा, असे बोलले जात आहे. सुमितला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. झडतीदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल (Mobile) फोन जप्त करण्यात आला, ज्याद्वारे तो अर्थ मंत्रालयाशी संबंधित गोपनीय माहिती लीक करत होता.

Union Ministry of Finance
Assembly Election Dates: त्रिपुरा, मेघालय अन् नागालँडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा...!

दुसरीकडे, या प्रकरणी ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही की, तो अर्थ मंत्रालयात कधीपासून काम करत होता आणि किती देशांना त्याने गोपनीय माहिती दिली आहे. हे प्रकरण अर्थ मंत्रालयाशी संबंधित असल्याने या प्रकरणाचा सविस्तर तपास केल्यानंतरच पोलिसांना (Police) या संदर्भात निवेदन जारी करायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com