Video: Naatu-Naatu ऑस्कर विजयानंतर अमित शहांनी घेतली राम चरणची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राम चरण आणि त्यांचे वडील चिरंजीवी यांची भेट घेतली असुन त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Naatu-Naatu
Naatu-NaatuDainik Gomantak
Published on
Updated on

Naatu-Naatu Wins Oscar: आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. या गाण्याने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल कॅटेगरीत ऑस्कर अवॉर्डचा किताब पटकावला असून, त्यामुळे देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राम चरण आणि त्यांचे वडील चिरंजीवी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे.

  • अमित शहा यांनी राम चरण आणि चिरंजीवी यांची भेट घेतली

या व्हिडिओमध्ये अमित शाह राम चरण याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना दिसत असत आहे. रिपोर्टनुसार, अमित शाह यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) राम चरणची ही भेट घेणार आहेत. ऑस्कर जिंकून राम चरण जेव्हा मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

चिरंजीवी यांनी अमित शहा यांचे आभार मानले

चिरंजीवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत लिहिले की 'ऑस्कर मोहिमेच्या यशस्वी मोहिमेबद्दल आणि भारतीय निर्मितीसाठी पहिला ऑस्कर घरी आणल्याबद्दल टीम RRR कडून रामचरण यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद अमित शाहजींना शुभेच्छा आणि आशीर्वाद. यावेळी उपस्थित राहून आनंद वाटतो.

आरआरआर चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. आरआरआर (RRR) चित्रपटात ज्युनियर एनटीआरने राम चरणसोबत मुख्य भूमिकेत दिसले. याशिवाय आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. गीते चंद्रबोस यांनी लिहिली आहेत. तर गाणी राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी गायली आहेत.आरआरआर एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये रिलीज झाल्यानंतरच 'नाटू नाटू' हे गाण खूप प्रसिद्ध झाले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com