'फौजदारी प्रक्रिया विधेयक-2022' लोकसभेत सादर, पोलिसांना मिळणार विशेष अधिकार

'क्रिमिनल प्रोसीजर बिल-2022 संसदेत सादर
Amit Shah
Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

Parliament budget 2022 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज नववा दिवस आहे. महागाईच्या मुद्द्यावरून राज्यसभा आणि लोकसभेत पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 'गुन्हेगारी प्रक्रिया विधेयक-2022' सादर करणार आहेत. याशिवाय वित्त आणि विनियोग विधेयक 2022 आज राज्यसभेच्या अजेंड्यावर असेल. (Amit Shah introduced The Criminal Procedure Bill 2022 in the Lok Sabha)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union home minister Amit Shah) यांनी आज संसदेत (Parliament) अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'फौजदारी प्रक्रिया विधेयक-2022' लोकसभेत सादर केले. त्यावेळी सभागृहाने 120 ते 58 मतांनी विधेयक सादर करण्यास मंजुरी दिली. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पोलिसांना (Police) विशेष अधिकार प्राप्त होतील, ज्या अंतर्गत पोलीस गुन्हेगारी प्रकरणातील गुन्हेगार आणि इतर व्यक्तींच्या ओळखीच्या नोंदी ठेवू शकतील. लोकसभेत हे विधेयक मंजूर होताच पोलिसांच्या कामकाजाशी संबंधित आयडेंटिफिकेशन (Identification) ऑफ प्रिझनर्स अॅक्ट 1920 रद्द होणार आहे.

Amit Shah
पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूलच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

या विधेयकाची माहिती देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी म्हणाले की, 1920 साली कैदी ओळख कायदा लागू करण्यात आला होता. त्यात फक्त बोट आणि पायाचे ठसे घेण्यात आले होते. जगात अनेक गोष्टी बदलल्या आहेत, गुन्हेगारांचा अधिक गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, म्हणून आम्ही 'क्रिमिनल प्रोसीजर बिल-2022' (Criminal Procedure (Identification) Bill, 2022 ) आणला आहे.

दरम्यान यावरून लोकसभेत (Lok Sabha) विरोधकांनी गदारोळ केला. ज्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २.१० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (टेनी) (Union Minister of State for Home Ajay Mishra (Teni)) म्हणाले, 'मला अधीर रंजन चौधरी यांना सांगायचे आहे की, मी 2019 मध्ये लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केली होती.' माझ्यावर एकही गुन्हा दाखल झाला, मी एक मिनिटही तुरुंगात गेलो, तर मी राजकारणाचा राजीनामा देईन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com