जमिनीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, 4 जणांची निर्घृण हत्या, 6 जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
amethi clash turned violent over land dispute 4 killed uttar pradesh
amethi clash turned violent over land dispute 4 killed uttar pradeshDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील अमेठी येथील ग्रामसमाजातील जमिनीच्या वादाचे रुपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. यानंतर एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या संघर्षात 4 जणांचा मृत्यू (Death) झाला. तर 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रकरण अमेठीतील गुंगवाचच्या राजापूर कौहरचे आहे. (amethi clash turned violent over land dispute 4 killed uttar pradesh)

येथे राहणारे संकट प्रसाद यांच्या घराजवळ ग्रामसभेची जमीन (land) पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील रामदुलारे, ब्रिजेश व अखिलेश हे बळजबरीने कब्जा करत होते. संकट प्रसादने नकार दिल्याने कब्जा करणाऱ्यांनी संकट प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी संकट प्रसाद, हनुमान यादव, धन्नो देवी, नायका देवी, राजकुमार यादव, अशोक कुमार यांना काठ्यांनी मारहाण केली आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

amethi clash turned violent over land dispute 4 killed uttar pradesh
महिला विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव

या हल्ल्यानंतर सर्वांना रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. संकट यादव, हनुमान यादव, अमरेश यादव आणि पार्वती यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि परिसराला छावणीचे स्वरूप आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गावातील सोसायटीच्या जमिनीशी संबंधित असून, यावरून दोन्ही यादव पक्षांमध्ये वाद सुरू होता. नुकतेच पोलिसांनीही दोन्ही कुटुंबांमध्ये समेट घडवून आणला होता, सध्या या मोठ्या घटनेने पोलिसांची (police) तारांबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com