AI GirlFriend : आता कोणीच सिंगल राहणार नाही; कंपनीने बनवली AI गर्लफ्रेंड, किंमत फक्त...

AI robot girlfriend : अमेरिकन टेक कंपनी रिअलबोटिक्सने 'आरिया' नावाची एक एआय रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. आर्या माणसांसारखी बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्यासोबत शेअर करू शकते.
AI GirlFriend
AI GirlFriendDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकन टेक कंपनी रिअलबोटिक्सने 'आरिया' नावाची एक एआय रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. आर्या माणसांसारखी बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्यासोबत शेअर करू शकते. कंपनीच्या म्हणण्यानूसार, 'आरिया' तुम्हाला आयुष्यभर साथ देईल.

आरियामध्ये अगदी खऱ्या माणसांसारखेच वैशिष्ट्ये आहेत. आरिया तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव कॉपी करू शकते. ती एका माणसांप्रमाणे प्रतिक्रिया देखील देऊ शकते. आरिया रोबोट सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाइन केलेली आहे.

कंपनीने आरिया रोबाटच्या तीन आवृत्त्या तयार केल्या आहेत. एका प्रकारात, फक्त मानेचा वरचा भाग उपलब्ध मिळणार. यासाठी १०,००० अमेरिकन डॉलर्स (८ लाख ६० हजार रुपये) तुम्हाला द्यावे लागतील. दुसरे मॉड्युलर आवृत्ती आहे. यासाठी १ कोटी २९ लाख रुपये द्यावे लागतील. तर तिसरा पर्याय पूर्ण आकाराचे मॉडेल आहे, ज्याची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये आहे.

AI GirlFriend
Goa: गोवा सरकारसमोर साडेतीन हजार कोटींचे कर्ज फेडण्याचे आव्हान! मोपा, खाणव्यवसायातील महसूलाकडे लक्ष

आरिया रोबोट एआय चॅटबॉटप्रमाणे तुमच्यासोबत संवाद साधू शकते. ती प्रश्नांना उत्तर देणे, सल्ले देणे, आणि व्यक्तीशी गप्पा मारणे अशा गोष्टी करू शकते.

रोबोटला माणसांच्या भावना ओळखण्याची क्षमता आहे, जसे की आनंद, दु:ख, राग, इत्यादी. ती त्या भावना लक्षात घेऊन योग्य प्रतिसाद देते.वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार रोबोटचे रूप, आवाज, आणि व्यक्तिमत्त्व निवडू शकतात.

'आरिया रोबाट'ची वैशिष्ट्ये काय?

आरिया रोबोट लास वेगासमधील २०२५च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये लाँच करण्यात आला आहे. ही कंपनी जिवंत माणसांसारखी बुद्धिमत्ता आणि वैशिष्ट्ये असलेले रोबोट तयार करण्यासाठी प्रसिध्द आहे.

मानसिक आधार देण्यासाठी, एकाकीपणा कमी करण्यासाठी मनोरंजनासाठी, जसे की गाणी ऐकवणे, कथा सांगणे, इत्यादीसाठी आरिया रोबोट तयार करण्यात आला आहे.

AI GirlFriend
Goa: करारानुसार घर न सोडल्यास 3 महिन्यांची कैद किंवा 1लाखापर्यंत दंड; भाडेकरू नियंत्रण दुरुस्ती कायदा कार्यान्वित

आरियाच्या संपूर्ण शरीरात १७ मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. या मोटर्समुळे आरियाला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते. आरियाचा चेहरा, केसांचा रंग आणि आपल्या आवडीनूसार कस्टमाइज करता येणार.

रोबोट्समध्ये आर.एफ.आय.डी. टॅग्ज जोडलेले आहेत, ज्यामुळे तिने कोणता चेहरा धारण केला आहे याचा अंदाज लावू शकते. या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्त्वात बदल करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com