Uttar Pradesh News: गाझियाबादच्या डासना मंदिरात एका अमेरिकन डॉक्टर महिलेने भगवान शंकराला सोन्याचा मुकुट आणि श्रृंगाराचे सामान अर्पण केले आहे. महिलेने अर्पण केलेला हा सोन्याचा मुकुट 19 तोळ्याचा असल्याचे सांगितले जात आहे.
हा मुकुट उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील दोन कारागिरांनी तयार केला आहे. यासोबत असा दावा केला जात आहे की, मुकुट दान करणारी महिला डॉक्टर आधी मुस्लिम होती, मात्र वर्षभरापूर्वी तिने हिंदू धर्म स्वीकारला.
श्री पंचदासनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि डासना मंदिराचे पीठाधीश्वर यती नरसिंहानंद गिरी यांनी सांगितले की, महिला डॉक्टर मूळची गुजरातची (Gujarat) आहे. ती सध्या अमेरिकेत राहते आणि तिथे औषधोपचार करते.
महामंडलेश्वर यांच्या म्हणण्यानुसार, "महिला डॉक्टर सुमारे 5 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या संपर्कात आली. त्यानंतर आमच्यात विचारांची देवाणघेवाण सुरु झाली." त्यांनी दावा केला की, "माझ्या बोलण्याने प्रभावित होऊन मुस्लिम महिला डॉक्टरने धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. सुमारे एक वर्षापूर्वी, तिने सनातन धर्म स्वीकारला आणि भगवान महादेव शिवाला गुरु मानले."
यती नरसिंहानंद गिरी यांनी सांगितले की, आता महिला डॉक्टरने डासना मंदिरात स्थापित पारेश्वर महादेवासाठी सोन्याच्या मुकुटासह संपूर्ण श्रृंगाराच्या वस्तू पाठवल्या आहेत. मुकुट हा सुमारे 19 तोळ्याचा आहे.
शिवशक्ती धाम डासना येथे झालेल्या रुद्राभिषेकानंतर पंडित सनोज शास्त्री व पंडित कृष्णवल्लभ भारद्वाज यांनी पारेश्वर महादेवाला सजविले.
यती नरसिंहानंद गिरी हे गाझियाबादच्या (Ghaziabad) डासना येथील शिवशक्ती धाम मंदिराचे पीठाधीश्वर आहेत. ते श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर देखील आहेत. याआधी, ते अनेक वादात सापडले आहेत. विशेष म्हणजे, द्वेषपूर्ण भाषणासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.