Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेसाठी प्रशासनचा मोठा निर्णय, या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

अमरनाथ यात्रेला दरवर्षी हजारो भाविक भोलेनाथाच्या दर्शनाला जात असतात.
Amarnath Yatra 2022 News
Amarnath Yatra 2022 NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Amarnath Yatra 2023: चारधामपैकी एक असलेले चारधाम म्हणजे अमरनाथ यात्रेला दरवर्षी हजारो भाविक दर्शनाला जात असतात. यावेळी यात्रेला 1 जुलैपासून सुरूवात होणार आहे.

यामुळे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या  19 जूनपासून सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

आरोग्य सेवा संचालक राजीव शर्मा  यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 19 जूनपासून प्रसूती रजा आणि वैद्यकीय कारणासाठी दिलेल्या रजा वगळता डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांच्या  इतर सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द  करण्यात आल्या आहेत. 

यात्रेकरूंची पहिली तुकडी दोन महिन्यांच्या प्रवासाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी जम्मू बेस कॅम्पवरून काश्मीरला रवाना होईल.

Amarnath Yatra 2022 News
Bihar Crime: बिहारमध्ये खाकीला मोठा डाग, महिलेला ओलिस ठेवून पोलिस प्रमुखाने केला 8 दिवस बलात्कार

अमरनाथला यात्रेसाठी असं करा रजिस्ट्रेशन

  1. अमरनाथ यात्रा 1 जुलै पासून सुरु होणार आहे. तसेच ही यात्रा 31 ऑगस्टला संपणार आहे. म्हणजेच अमरनाथची यात्रा जवळपास दोन महिने चालणार आहे. या यात्रेसाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करु शकता

  2. अमरनाथ यात्रेसाठी प्रवाशांना पूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत. घरापासून ते पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना हवामानाची माहितीही दिली जाईल.

  3. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला jksasb.nic.in या लिंकवर जावे लागेल. याठिकाणी सर्वात आधी अर्ज भरा आणि नंतर तुमचा OTP टाका. या अर्जासह पुढे जा आणि तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती पाठविली जाईल.

  4. यानंतर तुम्हाला पैसे भरावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल परमिट मिळेल, जे तुम्ही डाऊनलोड करु शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ऑफलाईन रजिस्टेशन देखील करु शकता.

  5. 13 ते 75 वर्षे वयोगटातील व्यक्ती अमरनाथ यात्रेला जाऊ शकतात. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.

  6. जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली तर तुम्हाला 100 ते 220 रुपये खर्च करावे लागतील. हेलिकॉप्टरच्या बुकिंगसाठी 13,000 रुपये मोजावे लागतील. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com