Chief Justice Uday Umesh Lalit
Chief Justice Uday Umesh LalitDainik Gomantak

Supreme Court तील लिस्टींग प्रणालीवर CJI म्हणाले, 'कोणीही नाराज नाही...'

Chief Justice Uday Umesh Lalit: सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या नव्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
Published on

Chief Justice Uday Umesh Lalit: भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी एक नवीन प्रणाली सुरु केली आहे. मात्र, खुद्द सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या नव्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आता CJI UU लळित यांनी कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश या प्रणालीवर एकमत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान, CJI म्हणाले, "आम्ही नवीन लिस्टींग प्रणाली स्वीकारली आहे. या प्रकरणी जे काही बोलले जात आहे, ते योग्य नाही. सर्व न्यायाधीश या प्रणालीवर एकमत आहेत. लिस्टींगच्या नव्या प्रणालीमुळे काम वेगाने सुरु आहे. या प्रणालीची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत 5200 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.''

Chief Justice Uday Umesh Lalit
Supreme Court: 'शैक्षणिक संस्थांना नियमांनुसार स्वतःचा गणवेश ठरवण्याचा अधिकार...'

लिस्टींगची नवीन प्रणाली

लिस्टींगच्या नव्या प्रणालीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) न्यायाधीश दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतील. सोमवार आणि शुक्रवारी दोन गटात न्यायाधीश सुनावणीसाठी बसतील. प्रत्येक गट नवीन प्रकरणे आणि जनहित याचिकांसह 60 स्वतंत्र प्रकरणांची सुनावणी करेल. याशिवाय मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ बसणार असून, ते वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची सुनावणी करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com