Viral Video: म्हणून आई सारखे कोणी नसते, मगरीने केला हत्तीच्या बाळावर हल्ला अन्... पाहा व्हिडिओ

अचानक मगरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हत्तीने मगरीशी झुंज दिली.
Viral Video
Viral Video Dainik Gomantak
Published on
Updated on

आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी सर्वात मोठ्या संकटाचाही सामना करू शकते, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल, असे नुसते सांगितले जात नाही तर अनेकदा पाहिले देखील आहे.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक हत्ती आपल्या मुलासह एका लहानशा जलाशयात पाणी पिण्यासाठी पोहोचला होता, तेव्हा अचानक मगरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हत्तीने मगरीशी झुंज दिली.

हा व्हिडिओ आयएएस सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे, ज्यामध्ये हत्ती मुलासह लहान तलावात दिसत आहे. हत्तीचे बाळही पाण्यात खेळत होते, पण मग पाण्यातच लपून बसलेल्या मगरीने बाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून हत्तीने मगरीवर हल्ला केला आणि हत्तीने मगरीला बाहेर हकलून लावले. हत्तीला धडकल्यानंतर मगर पाण्याबाहेर आली आणि पळू लागली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आईचे तिच्या मुलांसाठी असलेले प्रेम यापेक्षा पृथ्वीवर कोणतीही मोठी शक्ती असू शकत नाही. असे सुप्रिया साहू यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे.

Viral Video
बिहारमध्ये विषारी दारूमुळे 16 जणांचा मृत्यू ; पोस्टमॉर्टम न करताच सात जणांवर अंत्यसंस्कार

दरम्यान, यावर लोकांच्या कमेन्ट देखील आल्या आहेत. 'येथे 02 माता आहेत, एक (मगर) आपल्या मुलासाठी अन्न शोधण्याचा प्रयत्न करते, दुसरी (हत्ती) आपल्या मुलाचे रक्षण करते, दोन्ही माता आहेत. दोन्ही चूक नाहीत, दोन्ही बरोबर असू शकतात. हे सत्य आहे जे आपण मानवजातीने समजून घेतले पाहिजे. असे युजरने लिहिले आहे.

तर, आईच्या धाडसाला सीमा नसते कारण ती आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी काहीही करू शकते. असे दुसर्‍या युजरने लिहिले आहे.

जंगल खरोखरच मनोरंजक आणि आव्हानांनी भरलेले आहे. कधी, कुठे, कोणता धोका समोर येईल काहीच कळत नाही. असे एकाने लिहले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com