अल-कायदाकडून भारतातील अनेक महत्त्वाच्या वेबसाईट हॅक

प्रेषित मोहम्मद वादग्रस्त वक्तव्य प्रकरणावरुन हॅक केलेल्या 70 पैकी 50 वेबसाईट महाराष्ट्रातील
Cyber ​​Attacks
Cyber ​​AttacksDainik Gomantak
Published on
Updated on

प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात करण्यात आलेल्या वादग्रस्त मुद्यावरुन संपुर्ण भारतासह जगातील अनेक राष्ट्रांमध्ये संतापाची लाट होती. भारतातील काही ठीकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यानंतर आता याच मुद्यावरुन अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतातील वेगवेगळ्या शहरांवर सायबर हल्ले केले आहेत. यानंतर देशातील वेगवेगळ्या वेबसाईट्सवर सायबर हल्ल्याच्याबाबी समोर येत आहेत. यामध्ये संपुर्ण देशासह महाराष्ट्राच्या 50 वेबसाईट्स हॅक केल्याचं स्पष्ट झालं आहे. (Al-Qaeda hacks many important websites in India )

या हॅकमध्ये नागपूरमधील शासकीय विज्ञान संस्थेच्या वेबसाईटचाही समावेश आहे. तसेच हॅक करण्यात आलेल्या अनेक वेबसाईट्सवर वादग्रस्त संदेश झळकत आहे. त्यात ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे. हे हल्ले ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्स ग्रुपने देशातील अनेक वेबसाईट्सवर केले आहेत.

Cyber ​​Attacks
मनी लाँड्रिंग प्रकरणी अव्हेन्यू कोर्टाने सत्येंद्र जैन यांना सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

या हॅकींगमध्ये इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाच्या वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट आणि कृषी संसोधन केंद्राच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाईट्ससोबत इतरही अनेक वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत. एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार एक दोन नाही तर तब्बल 70 भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

Cyber ​​Attacks
गोव्यात यलो अलर्ट जारी तर दिल्लीसह 'या' राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

तसेच सायबर हल्ला केलेल्या वेबसाइट्सच्या यादीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, भवन्स आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या वेबस्टाईसचा समावेश आहे. सायबर हल्ले करण्यात आलेल्या 70 पैकी 50 वेबसाईट्स या महाराष्ट्रातील आहेत. यापैकी अनेक वेबसाईट्सवर अल-कायदाच्या हॅकर्सने ऑडिओ नोट पोस्ट केलीय. यामध्ये, “तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे तसाच आमच्यासाठी आमचा धर्म आहे,” असं वाक्य ऐकू येत आहे.

चिंताजनक बाब ही आहे की, या हॅकर्संने भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी इतर मुस्लीम हॅकर्सला आवाहन ही केले आहे. त्यामूळे भारतीय महत्त्वाच्या संस्थाच्या वेबसाईट याला बळी पडणार का ? आणि बळी पडल्या तर याचा परिणाम नेमका कीती प्रमाणात होणार हे पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे. या हल्ल्यांबाबत असा संशय आहे की, डेटा लीक करण्याबरोबरच आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिसचा प्रयत्न झाला आहे. आणि अनेक भारतीय सरकारी आणि खाजगी साइटवर देखील याचा परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com