Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना मोठा झटका बसला आहे. सीतापूर कारागृहातून आज मोहम्मदी सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने मोहम्मद जुबेरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. झुबेरविरुद्धच्या एफआयआरमध्ये कलम 153 बी, 505 (1) (बी), 505 (2) जोडण्यात आले होते.(Mohammad Zubair News)
धार्मिक भावना दुखावणाऱ्या ट्विट प्रकरणी मोहम्मद जुबेरला 27 जून रोजी अटक करण्यात आली होती. हिंदू शेर सेनेचे सीतापूर जिल्हाध्यक्ष भगवान शरण यांनी धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी 1 जून रोजी झुबेरची तक्रार दाखल केली होती. झुबेरने ट्विटरवर बजरंग मुनी, यति नरसिंहानंद आणि आनंद स्वरूप यांना ‘द्वेष पसरवणारे’ असे लिहिले आहे. हिंदू शेर सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शरण यांच्या तक्रारीवरून जुबेरविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* काय आहे आरोप
मोहम्मद जुबेरला 27 जून रोजी दिल्ली पोलिसांनी 2018 मध्ये पोस्ट केलेल्या ट्विटसाठी अटक केली होती. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. या आठवड्याच्या सुरुवातीला, यूपी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या (FIR) संदर्भात त्याला सीतापूर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. 10 जून 2022 रोजी, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यूपी पोलिसांचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला, कारण तपास प्राथमिक टप्प्यावर असताना हस्तक्षेप करणे खूप लवकर होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.