भाजप आमदार मेनका गांधी यांना घरचा आहेर

काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अन भाजपच्या नेत्या मेनका गांधी यांनी एका पशुवैद्यकीय चिकीत्सकला (Veterinarian) अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्याचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली होती.
Meneka Gandhi
Meneka GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेशचे माजी आरोग्यमंत्री आणि पटण्याचे भाजपचे (BJP) आमदार अजय विश्नोई (Ajay Vishnoi) यांनी आपल्या पक्षाच्या खासदार मेनका गांधी( Meneka Gandhi) यांच्यावर टीका केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अन भाजपच्या नेत्या मेनका गांधी यांनी एका पशुवैद्यकीय चिकीत्सकला (Veterinarian) अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्याचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली होती.

त्यावरच प्रतिक्रिया देताना ' मेनका गांधी यांनी बोलल्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालय हे काही खालच्या दर्जाचे होत नाही परंतु यामधून मेनका गांधी यांची वृत्ती जरूर दिसून येते आणि मेनका गांधी या माझ्या पक्ष्याच्या खासदार आहेत याची मला लाज वाटत आहे.' असे ट्विट करत आमदार अजय विश्नोई यांनी मेनका गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Meneka Gandhi
पंतप्रधान मोदींनी घेतला अयोध्या विकास प्रकल्पाचा आढावा

या प्रकाराबाबत सोशल मीडियावर नुकतीच एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर निषेध सुरू झाला असून ज्यामध्ये मेनका गांधी यांनी डॉ विकास शर्मा यांच्या पदांवरही प्रश्न उपस्थित केला आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाजाची स्वतंत्रपणे पडताळणी जरी झाली नसली तरी , सीतापूरच्या खासदाराने आपल्याला फोन केल्याचा थेट आरोप या डॉक्टरांनी केला आहे.

तसेच या ऑडिओमध्ये,कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी घेतलेले पैसे परत न केल्यास जिल्हाधिकारी यांना विचारून क्लिनिक बंद केले जाईल आणि संभंदीतांना तुरुंगात पाठवण्याची धमकीही या ऑडिओमध्ये ऐकू यात आहे.

यावर बोलताना डॉ . शर्मा म्हणाले, 'मला कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल खासदारांचा २१ जून रोजी फोन आला आणि त्यांनी मला प्राण्याच्या मालकाला नुकसान भरपाई म्हणून 70,000 रुपये देण्यास सांगितले नाहीतर त्या आपला परवाना रद्द करतील अशी धमकीही दिली आहे. दरम्यान आता या प्रकारानंतर भारतीय पशुवैद्यकीय संघटनेने भाजप खासदाराने जाहीर माफी मागून केलेले विधान मागे घेण्याची मागणी केली आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com