
AirPods Side Effects: आजकाल एअरपॉड्स आणि इतर 'इन-ईअर' उपकरणं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. ऑफिस कॉल्स असो वा वर्कआउट, कामाच्या किंवा मनोरंजनाच्या नावाखाली आपण अनेकदा ही उपकरणं तासनतास वापरतो. मात्र, त्यांचा अतिवापर आपल्या कानांसाठी किती हानिकारक ठरू शकतो, हे एका ताज्या घटनेनं समोर आणलं आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि 'ओसग्लो इंडिया'च्या सह-संस्थापक आरुषी ओसवाल हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून हे धक्कादायक सत्य सर्वांसमोर आणलंय.
आरुषीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की, दिल्लीहून परत येत असताना तिने सलग सुमारे ८ तास एअरपॉड्सचा वापर केला. त्यानंतर तिच्या डाव्या कानाची ४५ टक्के श्रवणशक्ती कमी झाली. जो दिवस सामान्य वाटत होता, तो अचानक एका आणीबाणीमध्ये बदलला. डॉक्टरांनी तिला सांगितलं की, श्रवणशक्ती सुधारण्यासाठी तिला भरपूर औषध आणि कानात स्टिरॉइड इंजेक्शन द्यावं लागेल, जी एक अत्यंत वेदनादायक प्रक्रिया आहे.
सुदैवाने, जर तिने आता हेडफोनचा वापर पूर्णपणे टाळलाय, तर एका आठवड्यात तिची श्रवणशक्ती परत येण्याची शक्यता आहे. आरुषीने आपल्या फॉलोअर्सना इअरफोन्स किंवा हेडफोन्स जास्त वेळ न वापरण्याची ताकीद दिली आहे.
विशेषज्ञ आधीपासूनच या धोक्याबद्दल इशारा देत आले आहेत की, मोठ्या आवाजात आणि जास्त वेळेपर्यंत 'इन-ईअर' हेडफोनचा वापर श्रवणशक्तीला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनेचा सल्ला आहे की, आवाजाची पातळी ७० डेसिबलपेक्षा कमी ठेवावी आणि एका वेळी ६० मिनिटांपेक्षा जास्त हेडफोन वापरू नयेत. पण आरुषीसारखे अनेक लोक सलग अनेक तास एअरपॉड्सचा वापर करतात, ज्यामुळे अनेकदा कायमस्वरूपी श्रवणशक्ती गमावण्याचा धोका असतो.
मध्यम आवाजातही अनेक तास ऐकल्याने कानाच्या आतील नाजूक 'केशपेशी' थकतात आणि कालांतराने हे नुकसान कायमस्वरूपी होऊ शकतं. श्रवणशक्ती गमावण्याचा परिणाम केवळ आवाज ऐकू न येण्यापुरता मर्यादित नसतो, तर यामुळे स्मरणशक्ती आणि भविष्यात डिमेंशियासारख्या मानसिक रोगांचा धोकाही वाढू शकतो.
आरुषीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, सुविधेच्या नावाखाली आपण आपल्या आरोग्याला धोक्यात घालू नये. तिने आपल्या फॉलोअर्सना सल्ला दिला आहे की, मध्ये-मध्ये ब्रेक घ्या, आवाजाची पातळी कमी ठेवा आणि जर कानात घंटा वाजल्यासारखं वाटलं, जडपणा जाणवला किंवा आवाज कमी ऐकू येत असेल, तर त्वरित सावध व्हा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.