Flight Emergency Landing: दुर्घटना टळली! विमानात मोबाईलचा स्फोट, एअर इंडियाचे उदयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Air India Flight Emergency Landing: राजस्थानमधील उदयपूरमध्ये सोमवारी मोठी विमान दुर्घटना टळली. एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
Air India
Air IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Air India Flight Emergency Landing: राजस्थानमधील उदयपूरमध्ये सोमवारी मोठी विमान दुर्घटना टळली. एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशाच्या मोबाईल फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

तांत्रिक तपासणीनंतर विमान दिल्लीला रवाना करण्यात आले. फ्लाईटदरम्यानच फ्लाइटच्या आत असलेल्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

दरम्यान, उदयपूरच्या (Udaipur) डबोक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करताना काही प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची व्यवस्थित तपासणी करण्यात आली. सर्वकाही बरोबर असल्याचे आढळल्यानंतर, विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केले.

Air India
Air India Vistara Merger: एअर इंडियाला झटका! टाटा समूहाची मोठी योजना अडचणीत, आधी द्यावं लागेल 'हे' उत्तर

फ्लाइटमध्ये 140 प्रवासी होते

एअर इंडियाच्या (Air India) फ्लाइट क्रमांक-470 मध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने उदयपूरहून दिल्लीला दुपारी एक वाजता उड्डाण केले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच प्रवाशाच्या मोबाईल फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाला.

या फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. फोनच्या बॅटरीचा स्फोट इतका जोरदार होता की, फ्लाइटमध्ये बसलेले सर्व लोक घाबरले. विमानातील क्रू मेंबर्सनी प्रवाशांचा आढावा घेतला. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मोठा अपघात झाला असता

याआधीही अनेकदा विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. मात्र, विमानाच्या आत असलेल्या प्रवाशाच्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे फ्लाइटच्या आत आग लागण्याची शक्यता आहे.

Air India
Air India Flight : दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानामध्ये बिघाड, रशियामध्ये इमर्जेन्सी लँडिंग

इंडिगो विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

गेल्या महिन्यातच इंडिगो विमानाचे IGI विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. इंडिगोचे विमान दिल्लीहून डेहराडूनला जात होते. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे 21 जून रोजी विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com