Ahmedabad Plane Crash: 'जळालेली झाडे अन् काळवंडलेल्या भिंती'! अहमदाबाद विमान अपघातानंतर वैद्यकीय वसतिगृहाची भीषण अवस्था

Ahmedabad plane crash medical hostel: अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेले विमान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. या भीषण अपघाताच्या खुणा अद्यापही या भागात दिसत आहेत.
Ahmedabad plane crash medical hostel
Ahmedabad plane crash medical hostelDainik Gomantak
Published on
Updated on

अहमदाबाद: जळालेली झाडे..! अर्धवट पडलेल्या आणि काळवंडलेल्या भिंती...! रिकामे आणि भकास दिसत असलेले वैद्यकीय रुग्णालयाचे आवार...एक महिन्यापूर्वी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर वैद्यकीय वसतिगृह संकुलाची अवस्था सध्या अशी आहे.

अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेले विमान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. या भीषण अपघाताच्या खुणा अद्यापही या भागात दिसत आहेत. एक महिन्यानंतर या इमारतीच्या पुनर्निर्माणासाठी कोणतेही काम सुरू झालेले नाही. अतिरिक्त पोलिस आयुक्त जयपालसिंह राठोड यांनी सांगितले, ‘‘अंदाजे ५०-६० पोलिस कर्मचारी अपघातस्थळाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. या अपघाताच्या प्राथमिक तपासाचा अहवाल आल्यानंतर पोलिस सुरक्षेची यासाठी आवश्यकता भासणार नाही.’’

आवारातील क्रमांक १ ते ४ या चार वसतिगृहांच्या इमारती आणि जेवणाची इमारत यांचे गंभीर नुकसान झाले. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी पारिख यांनी सांगितले की सुमारे १५० विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यात आले असून, त्यांना तत्काळ इतर वसतिगृहांतील मोकळ्या खोल्यांमध्ये किंवा महाविद्यालयाने भाड्याने घेतलेल्या खासगी अपार्टमेंट्समध्ये हलवण्यात आले.

Ahmedabad plane crash medical hostel
Ahmedabad Plane Crash Report: "इंधन पुरवठा बंद केलास का?", अहमदाबाद दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; प्राथमिक अहवालात समोर आला दोन्ही पायलटचा 'शेवटचा' संवाद

‘‘आम्ही एका आठवड्याच्या आत पर्यायी निवासाची व्यवस्था केली. नुकसान झालेली जेवणाची इमारत आता वापरात नाही आणि विद्यार्थ्यांना आता इतर वसतिगृहांतील कँटीनमध्ये जेवण दिले जात आहे,’’ असे त्यांनी सांगितले. अपघातात नुकसान झालेल्या वसतिगृहाचे टेरेस आता एका बाजूला कललेले आहे. विमानाची मागची बाजू धडकल्यामुळे तेथे एक मोठे भगदाड पडले असून, तेथे डागडुजी करण्यात आली आहे.

Ahmedabad plane crash medical hostel
Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाला DGCA चा दणका!! अहमदाबाद विमान अपघातानंतर तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

‘‘विमानाचा उजवा भाग पाण्याच्या टाकीच्या संरचनेवर आदळला आणि विमानापासून वेगळा होऊन त्याखाली अडकून राहिला. विमानाचा पहिल्या इमारतीशी संपर्क झाल्यानंतर त्याचे विविध भाग वेगळे झाले आणि चार अन्य इमारतींना धडकले. उजव्या पंखाचे काही भाग दोन इमारतींमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात सापडले तर डाव्या बाजूच्या इंजिनाने चौथ्या इमारतीला धडक दिली असेही प्राथमिक तपास अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com