Agriculture: भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व!

India Economy: भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे स्थान पाठीच्या कण्यासारखे आहे, असे नेहमी म्हटले जाते.
Agriculture
AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

India Economy: भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे स्थान पाठीच्या कण्यासारखे आहे, असे नेहमी म्हटले जाते. मात्र नैसर्गिक संकटांमुळे कृषिमालाचा बाजारात पुरवठा कमी झाला तर त्याचे पडसाद संपूर्ण अर्थव्यवस्थेवर उमटू लागतात.

राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा

स्वातंत्र्य प्राप्तीवेळी कृषी (Agriculture) आणि संलग्न क्षेत्राचा जीडीपी (GDP) मधील वाटा 50 टक्क्यांहून अधिक होता. त्यानंतर तो घसरत गेला. 2010-11 मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हिस्सा 14.6 टक्के इतका होता. तो आता 2020-21 मध्ये 20.2 टक्के इतका झाला आहे. प्रगतशील राष्ट्रांच्या तुलनेत आजही भारतातील (India) राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा हा अधिक आहे. मात्र, सध्या सेवा आणि औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या प्रमाणामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा कमी चालला आहे.

Agriculture
Dearness Allowance: केंद्राच्या घोषणेनंतर या राज्यानेही वाढवला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता

रोजगार निर्मितीत योगदान

गेल्या 75 वर्षांचा आढावा घेतल्यास आपल्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठळकपणे सामोरे येते ते म्हणजे शेती आणि बिगरशेती क्षेत्रावर उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्या व्यक्तींचे प्रमाण वाढतच आहे. देशाच्या फक्त ग्रामीण भागाचा विचार केल्यास एका अभ्यासानुसार, 2011-12 साली 64 टक्के लोक शेती क्षेत्रात गुंतले होते. तर उर्वरित 36 टक्के लोक बिगरशेती व्यवसायात गुंतले होते. 

परकीय व्यापारात योगदान

निर्यातीमध्ये चहा, कॉफी, ज्यूट, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड या घटकांना अनन्यसाधारण महत्व आहे. अलीकडच्या काळात भारत अन्नधान्याची निर्यात मोठया प्रमाणात करत आहे. विशेष म्हणजे, भारताला यामधून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होत आहे. सध्या निर्यातीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा 13.79 टक्के इतका आहे.

Agriculture
या कारणांमुळे, सरकार कोणत्याही परिस्थितीत महागाई भत्ता अडवू शकत नाही

आर्थिक नियोजनाला मदत

दुसरीकडे, आर्थिक नियोजनाची अमलंबजावणी करताना शेती क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश हा शेती होता. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेत उद्योग क्षेत्रावर भर देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com