kanjhawala Case: कंझावाला केसमधील मुख्य साक्षीदार निधीवर ड्रग्ज तस्करीचा आरोप

kanjhawala Case: मुख्य साक्षीदार मानल्या जाणाऱ्या निधीला ड्रग्ज प्रकरणात आग्रा पोलीसांनी 2020 ला अटक केली होती.
kanjhawala Case
kanjhawala CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

kanjhawala Case: दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी कांझीवाला येथे एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एका कारने तिला 12 किलोमीटर फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला होता.

पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. या प्रकरणात निधी नावाची मुलगी महत्वाची साक्षीदार मानली जात आहे. आता मात्र पोसिसांच्या अधिक तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. मुख्य साक्षीदार मानल्या जाणाऱ्या निधीला ड्रग्ज प्रकरणात आग्रा पोलीसांनी 2020 ला अटक केली होती.

तिच्याबरोबर आणखी दोन मुलांना अटक करण्यात आली होती. एक महिना कारागृहात राहिल्यानंतर तिला जामीन मिळाला होता. पोलीस रेकॉर्डप्रमाणे निधी ड्रग्ज तस्करीसाठी सिंकदराबादला गेली होती. तिथून ती आपल्या साथीदारांसोबत आग्र्याला आली होती . मात्र आग्रा पोलीसांच्या सतर्कतेमुळे निधी तिच्या साथीदारांसह पकडली गेली होती. पोलासांनी त्यांच्याकडून 10 किलो गांजा जप्त केला होता.

kanjhawala Case
West Bengal: हावडामधून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक, ISIS शी संबंध असल्याचा आरोप

दिल्ली( Delhi ) महिला आयोगाच्या अध्यक्षकांनी ड्रग्ज( Drugs ) तस्करीमध्ये सापडलेल्या आणि कंझावाला प्रकरणात सापडलेल्या दीपक नावाच्या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. हे दोन्ही दीपक एकच आहेत का ? अंजलीच्या मृत्यूमध्ये निधीचा हात आहे का ?असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, पोलीसांनी दोन्ही प्रकरणांचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Firing Case Latest Update
Goa Casino Director Shooting Case
Khair Wood Smuggling In Pernem
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com