Lok Sabha Elections 2024: ''काँग्रेस सत्तेत येताच अग्निवीर योजना बंद करु...''; प्रियंका गांधींनी देवभूमीतून मोदी सरकारवर साधला निशाणा

Priyanka Gandhi: मोदी सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांपैकी एक असलेली अग्निपथ योजना काँग्रेस सत्तेत आल्यानंतर बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiDainik Gomantak

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी जोरात सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, विरोधक मोदींचा विजयीरथ रोखण्यासाठी मतदारांना आकर्षित करत आहेत. काँग्रेस विरोधकांना एकजूट करुन मोदींना निवडणुकीच्या रिंगणात टक्कर देण्यासाठी मैदानात उतरला आहे. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस मोदी सरकारने सुरु केलेल्या अनेक योजना बंद करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मोदी सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांपैकी एक असलेली अग्निपथ योजना काँग्रेस सत्तेत आल्यानंतर बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवडणुकीच्या भाषणात उत्तराखंडला देवभूमी म्हणू शकतात, पण देवभूमीच्या जनतेवर संकट असताना पंतप्रधान आणि त्यांचे खासदार आणि मंत्री कुठेच दिसत नाहीत.

महिला सक्षमीकरणाचा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच अंकिता भंडारी खून प्रकरण, हाथरस, उन्नाव आदी जघन्य गुन्हे घडले, असा आरोप त्यांनी केला. अशा परिस्थितीत मोदी सरकार पुन्हा चालणार नाही, असे प्रियंका म्हणाल्या.

Priyanka Gandhi
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत डिजिटल प्रचारावर भर; गुगलवरील राजकीय जाहिरातींमध्ये 'एवढ्या' पटीने वाढ

दरम्यान, उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर येथील पीरुमदरा किसान इंटर कॉलेजमध्ये शनिवारी आयोजित सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, ''गेल्या काही काळापासून केंद्रात सत्तेत असूनही भाजप प्रत्येक वेळी काँग्रेसला दोष देत आहे.''

आता निवडणुका येताच सिलिंडर स्वस्त करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, रोजगार उपलब्ध करुन देणे अशी आश्वासने दिली जात आहेत. प्रियंका सभेला संबोधित करताना म्हणाल्या की, पंतप्रधान जेव्हा उत्तराखंडमध्ये प्रचारासाठी येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की त्यांनी यापूर्वी दिलेली आश्वासने का पूर्ण केली का? त्या पुढे म्हणाल्या की, पंतप्रधानांच्या कथनी आणि करणीमध्ये खूप तफावत आहे. दरम्यान, प्रियंका यांनी गढवाल मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गणेश गोडियाल, अल्मोडा मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप टमटा आणि नैनिताल-उधम सिंग नगर मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश जोशी यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

Priyanka Gandhi
Lok Sabha Elections 2024: ''आम्ही ममता बॅनर्जीकडे भीक मागितली नाही'', पश्चिम बंगालमध्ये 2 जागांची ऑफर केल्याने अधीर रंजन चौधरी भडकले

प्रियंका गांधी यांची निवडणूक आश्वासने

काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस केंद्रात आल्यास सर्वप्रथम अग्निवीर योजना रद्द करेल. पेपरफुटीसाठी कडक कायदा केला जाईल. केंद्र सरकारमध्ये 30 लाख रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित वस्तू जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवल्या जातील. काँग्रेस सरकार तरुणांना स्टार्टअपसाठी 5,000 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com