बंगालमधील हिंसाचारानंतर अधिकाऱ्यांची उचलबांगडी, भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक

बंगालमधील हावडामध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर आता बंगाल सरकारने अनेक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Howrah
HowrahDainik Gomantak
Published on
Updated on

बंगालमधील हावडामध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर आता बंगाल सरकारने अनेक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आदेशात म्हटले आहे की, राज्य सरकारने कोलकाता पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण त्रिपाठी यांची हावडा शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. कोलकाता पोलिसांच्या डीसीपी (Southwest) स्वाती भंगालिया यांना हावडा (Rural) येथील नवीन पोलिस अधीक्षक बनवण्यात आले आहे. (After The Violence In Bengal The Officers Fell Bjp State President Arrested On The Way To Howrah)

दरम्यान, भाजपच्या (BJP) पश्चिम बंगाल (West Bengal) युनिटचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांना शनिवारी पोलिसांनी हिंसाचारग्रस्त असणाऱ्या हावडामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली.

Howrah
पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूलच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर दिनाजपूरमधील बालूरघाटचे खासदार मजुमदार यांना विद्यासागर सेतूवर असलेल्या टोल प्लाझाजवळ अटक करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "हावडामध्ये सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. जिथे मजुमदार जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. खबरदारी म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे, शनिवारी हावडामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर चुकीची माहितीचा प्रसार होऊ नये म्हणून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही भागांमध्ये इंटरनेट सेवा 14 जूनपर्यंत बंद करण्यात आली आहे. जिथे असे निर्बंध आधीपासूनच आहेत. बेलडंगा पोलीस स्टेशन हद्दीतील बेलडांगा 1 ब्लॉक, रेजीनगर आणि शक्तीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेलडांगा 2 ब्लॉकमधील इंटरनेट सेवा 14 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे. संपूर्ण हावडा जिल्ह्यात 13 जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर 15 जूनपर्यंत उलुबेरिया, डोमजूर आणि पांचाला यासारख्या अनेक भागात फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Howrah
पश्चिम बंगाल: उपसरपंचांची हत्या; संतप्त समर्थकांनी 8 जणांना जिवंत जाळले

विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शुक्रवारी हावडा जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या निषेधानंतर निर्बंध लादण्यात आले. हावडामध्ये हिंसक निदर्शने आणि पोलिसांशी (Police) चकमकी दरम्यान आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्येच आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com