JK मध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, कर्ण सिंह ठोकणार कॉंग्रेसला रामराम

Congress: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला.
Karan Singh
Karan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Former Union Minister Karan Singh: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला. आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. महाराजा हरिसिंह यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह यांनीही काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. कर्ण सिंह म्हणाले की, '1967 मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण आज पक्षाशी असणारे माझे संबंध कमी झाले आहेत.'

कर्ण सिंह पुढे म्हणाले, '1967 मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण मागील 8 ते 10 वर्षे झाले मी संसद सदस्यही नाही. कॉंग्रेस कार्यकारिणीतून मलाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. होय, मी काँग्रेसमध्ये आहे, परंतु पक्षातील बड्या नेत्यांशी माझा संपर्क राहिलेला नाही. माझ्याशी कोणीही बोलत नाही.'

Karan Singh
गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ JK मधील 64 काँग्रेस नेत्यांचा राजीनामा

दरम्यान, कर्ण सिंह यांचे हे वक्तव्य काँग्रेस सोडण्याचे संकेत मानले जात आहे. जम्मू आणि काश्मीर संस्थानातील शेवटचे महाराजा हरि सिंह यांचा पुत्र कर्ण सिंह 1967 ते 1973 या काळात केंद्र सरकारमध्ये (Central Government) मंत्री होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुलाम नबी आझाद यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचेही कर्ण सिंह यांच्याशी चांगले संबंध आहेत. अलीकडेच त्यांनी एक पुस्तक लिहिले, ज्याचे प्रकाशन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यावेळी त्यांनी कर्ण सिंह यांचे कौतुकही केले होते. कर्ण सिंह यांनी त्यांच्या भविष्यातील योजनेबद्दल काहीही सांगितले, नसले तरी पक्ष सोडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Karan Singh
Jammu Kashmir: काँग्रेसला मोठा धक्का, गुलाम नबी आझाद यांचा प्रचार समितीच्या अध्यक्षपदाला रामराम

विशेष म्हणजे, काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ते सातत्याने सभा घेत आहेत. या प्रचारसभांमधून ते थेट राहुल गांधींवरही निशाणा साधत आहेत. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना गुलाम नबी आझाद म्हणाले होते की, 'राहुल गांधी राजकारणात येताच काँग्रेसची जुनी व्यवस्था पुरती कोलमडली, जी अनेक दशकांपासून सुरु होती.' त्यावर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ते भाजपची भाषा बोलत असल्याचे म्हटले होते. गुलाम नबी आझाद यांनी यापूर्वीही म्हटले होते की, 'आता कलम 370 जम्मू-काश्मीरमध्ये परत लागू होऊ शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com