Aero India 2023: जेटपॅक सूटमुळे आता हवेत उडणार सैनिक

Aero India 2023: भारतीय सेनेने हा जेटपॅकसूट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
Aero India 2023
Aero India 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Aero India 2023: बेंगलोर मध्ये एरो इंडिया शो सुरु आहे. एरो इंडिया हा शो 5 दिवसांसाठी असून यामध्ये तिन्ही सेनांच्या तंत्रज्ञानावर जोर दिल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात जेटपॅक सूट सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

असे म्हटले जात आहे की, हा सूट घातल्यानंतर माणूस जेट बनतो. जेटसूटचे वैशिष्ट्य आहे की, माणूस हा सूट घातल्यानंतर 10-15 किलोमीटर उंच हवेत उडू शकतो. महत्वाचे म्हणजे, हा सूट कोणत्याही हवामानात काम करु शकतो.

त्यामुळे सैनिकांना या जेटसूटची मोठी मदत होईल असे म्हटले जात आहे. शत्रूला मात देण्यात हा सूट मोठी भूमिका निभावणार असल्याचे म्हटले जात आहे. गॅस टर्बाइनवर हा जेट सूट काम करत असून याचे वजन 40 किलोग्रॅमपर्यत असते.

Aero India 2023
IT Raid On BBC: 'बीबीसी'च्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयांवर छापे, इन्कम टॅक्स विभागाची कारवाई

सैनिक त्यांना पाहिजे तेव्हा यासूटद्वारे हवेत उडू शकतात आणि त्यांना पाहिजे तेव्हा जमिनीवर येऊ शकतात, असे या जेटसूट सिस्टिम आहे. आठ मिनिटापर्यंत 50 किलोमीटर प्रतितास हा जेटपॅकसूट हवेत राहू शकतो.

भारतीय सेनेने हा जेटपॅकसूट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. बेंगलोर( Bengaluru )मधील राघव रेड्डी यावर काम करत आहेत. सीमा( Border )भागातील पाहणी करण्यासाठी,डोंगराळ भागात आणि जंगलात पाहणी करण्यासाठी या जेटसूटची मदत होईल.

दरम्यान, या सूटमध्ये अशी एक कमतरता आहे की हा सूट घालून सैनिक फक्त हवेत उडू शकतात मात्र हत्यारे चालवू शकत नाहीत. कारण सूट कंट्रोल करण्याची सिस्टिम दोन्ही हातात असल्याने सैनिकांना हातांचा वापर करु शकणार नाहीत.

भविष्यात यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. एरो स्पेस शोमध्ये जगभरातील 98 देशांतल्या 100 डिफेंन्स कंपन्यांनी भाग घेतला असून भारताच्या 700 पेक्षा जास्त कंपन्यादेखील सहभागी झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com