अंत्यसंस्काराचा वाद कोर्टात! अवैध संबधातून इस्लाम स्वीकारणाऱ्या नवऱ्याच्या अंत्यविधीचा अधिकार हिंदू पत्नीला

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच एका हिंदू पत्नीला तिच्या मुस्लिम पतीचे अंतिम संस्कार करण्याची परवानगी दिली आहे.
Madras High Court
Madras High CourtDainik Goantak
Published on
Updated on

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच एका हिंदू पत्नीला तिच्या मुस्लिम पतीचे अंतिम संस्कार करण्याची परवानगी दिली आहे. महिलेच्या पतीने मुस्लिम महिलेसोबत अवैध संबंध ठेवल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता. पुढे दोघांनी लग्न केले. न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना हिंदू महिलेला अंतिम संस्कार करण्यास परवानगी दिली. त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला होता.

दरम्यान, मृत व्यक्तीची हिंदू पत्नी आणि मुस्लिम मुलाने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. हिंदू पत्नीने कायदेशीर जोडीदार म्हणून तिचा हक्क सांगताना अंतिम संस्कार करण्याच्या अधिकारासाठी युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, मुस्लिम मुलाने असा युक्तिवाद केला की त्याच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता, त्यामुळे त्याचा आणि त्याच्या आईचा अंतिम संस्कार करण्याचा कायदेशीर दावा आहे. मृत्यूपूर्वी मृत व्यक्तीने इस्लाम धर्म स्वीकारला होता यावर कोणताही वाद नसला तरी मुस्लिम महिलेसोबतच्या लग्नाला कायदेशीर मान्यता देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.

Madras High Court
Madras High Court: 'न्यायालयांमध्ये महात्मा गांधी आणि तमिळ संत-कवी तिरुवल्लुवर यांचेच फोटो...', मद्रास HC चा आदेश

उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, मृत बालसुब्रमण्यम यांनी 1988 मध्ये त्यांची हिंदू पत्नी बी शांतीसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी झाली. याचदरम्यान सय्यद अली फातिमासोबत बालसुब्रमण्यम यांचे अवैध संबंध होते. यानंतर पुढे जावून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर बालसुब्रमण्यम अन्वर हुसेन बनले आणि 1999 मध्ये इस्लामिक रितीरिवाजांनुसार फातिमाशी लग्न केले. त्या लग्नातून एक मुलगा झाला.

दुसरीकडे, बालसुब्रमण्यम यांनी 2017 मध्ये तामिळनाडू सरकारच्या राजपत्राद्वारे माहिती दिली की त्यांनी 10 मे 2016 रोजी अन्वर हुसेन नावाने इस्लाम स्वीकारला होता. त्यानंतर, त्यांनी शांतीसोबतचे लग्न मोडण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. 2021 मध्ये न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली. मात्र, त्यांच्या पहिल्या पत्नीने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या निर्णयाचा आढावा घेत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तो आदेश रद्द केला.

Madras High Court
Madras High Court |"सोशल मीडियावरील मॅसेज, बाणासारखा"; आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या माजी आमदाराला कोर्टाचा झटका

दरम्यान, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्यरित्या बाजूला ठेवला असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत बालसुब्रमण्यम उर्फ ​​अन्वर हुसेन यांची कायदेशीर विवाहित पत्नी म्हणून केवळ शांतीच मानली जाऊ शकते. उच्च न्यायालयाने पोलिसांना सांगितले की, सय्यद अली फातिमा आणि अब्दुल मलिक यांना अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचा निश्चित अधिकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com